ETV Bharat / state

Supriya Sule : शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंचं भाजपाला सडेतोड उत्तर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 8:07 PM IST

Supriya Sule On Sharad Pawar Statement
Supriya Sule On Sharad Pawar Statement

Supriya Sule On Sharad Pawar : इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पाठिंबा पॅलेस्टाईनला असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून शरद पवारांवर टीकेची झोड उठवण्यात आली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई : Supriya Sule On Sharad Pawar Statement : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे पडसाद जगभर उमटत आहेत. या युद्धामुळं जगभरात समर्थकांचे दोन गट तयार झाले आहेत. देशातील अनेक संघटना, पक्षांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर भाष्य केलंय. शरद पवारांच्या इस्रायल-पॅलेस्टाईनवरील वक्तव्यानंतर भाजपानं त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हेमंत बिस्वा सरमा यांच्या वक्तव्यानं मला आश्चर्य वाटलं. शरद पवार आणि हेमंत बिस्वा सरमा यांचा डीएनए एकच आहे. दोघेही पूर्वी काँग्रेसमध्ये होते. इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाबाबत शरद पवार काय म्हणाले, हे भाजपाच्या आयटी सेलनं समजून घेण्याची गरज आहे - खासदार सुप्रिया सुळे

भाजपाचा आयटी सेल सक्रिय : आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना गाझा पट्टीत पाठवण्याचं वक्तव्य केलं होतं. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवारांचे विधान कोणीही निट वाचलेलं नाही, मात्र, भाजपाचा आयटी सेल लगेच सक्रिय झाला, असं सुळे यांनी म्हटलंय. इस्रायल, पॅलेस्टाईनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला पाठिंबा पॅलेस्टाईनला असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून शरद पवारांवर टीकेची झोड उठवण्यात आली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलंय.

शरद पवारांचे स्टेटमेंट पूर्ण ऐकलं नाही : दुर्दैव असं आहे की, कोणीही शरद पवारांचं स्टेटमेंट पूर्ण ऐकलं नाही. हा भाजपाच्या आयटी सेलनं घातलेला गोंधळ आहे. बेरोजगारी, महागाईसारखं मोठं आव्हान असताना भाजपा लक्ष वळवण्यासाठी असे प्रकार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध, त्यानंतर आता इस्राय-पॅलेस्टाईनमध्ये गाजा पट्ट्यात युद्ध सुरू आहे. तिथे झालेल्या हॉस्पिटल अटॅकमध्ये 500 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. आपण इतके असंवेदनशील झाले आहात का? असा प्रश्न देखील सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. अशा प्रकारच्या असंवेदनशील विषयात भाजपा भातुकलीचा खेळ खेळतात हे दुर्दैव आहे, असा हल्लाबोल सुळे यांनी भाजपावर केलाय.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut On Devendra Fadanvis : 'मिस्टर फडणवीस हिम्मत असेल तर...', संजय राऊतांचं ओपन चॅलेंज
  2. Solapur Drugs Factory : उडता सोलापूर; पुणे राष्ट्रीय महामार्गावर सहा कोटींचा एमडी ड्रग्जसाठा जप्त, ड्रग्ज तस्करांना पोलीस कोठडी
  3. Mumbai Pollution : मुंबई महानगराचा श्वास कोंडला! महाविकास आघाडीचा 'कृती आराखडा' लागू करा, काँग्रेसची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.