"गेल्या दहा वर्षांत खासदार...", रवींद्र वायकरांचा गजानन कीर्तिकरांना घरचा आहेर - Ravindra Waikar

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 2:41 PM IST

thumbnail
रवींद्र वायकर यांची गजानन कीर्तिकर आणि अमोल कीर्तिकर यांच्यावर टीका (reporter)

मुंबई Ravindra Waikar News : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी एका मुलाखतीत बोलत असताना वडिल विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी मतदारसंघा विकासकामं केल्याचा दावा केला.  ''माझे वडील गजानन कीर्तिकर यांनी आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून येऊन लोकसभा मतदारसंघात विकास कामं केली होती. नऊ वर्षात ते आमच्या पक्षात होते. एक वर्षापासून ते दुसऱ्या पक्षात असल्यामुळं नऊ वर्षाच्या विकास कामाच्या जोरावर आपण मतदान मागणार आहोत.'' अशी भूमिका अमोल कीर्तिकर यांनी मांडली. यासंदर्भात महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी, "गेल्या दहा वर्षांत इकडं खासदार फिरकलेच नाहीत." असं म्हणत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना टोला लगावला. तसंच आयजीच्या जीवावर बायजी म्हणत त्यांनी अमोल कीर्तिकरांवरही टीका केली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.