ETV Bharat / bharat

मान्सून यावर्षी देणार सुखद धक्का; सगळे रेकॉर्ड मोडून केरळमध्ये 'या' तारखेलाच दाखल होण्याची शक्यता - Southwest Monsoon 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 2:24 PM IST

Southwest Monsoon 2024 : देशात या वर्षी मान्सूनचं आगमन लवकर होणार असल्यानं शेतकऱ्यांना मोठा सुखद धक्का बसणार आहे. मान्सून यावर्षी केरळच्या किनाऱ्यावर 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.

Southwest Monsoon 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Marathi)

नवी दिल्ली Southwest Monsoon 2024 : देशात मान्सूनचं एक जूनच्या आसपास आगमन होत असल्यानं शेतीच्या कामांना प्राध्यान्य देण्यात येते. या वर्षी मात्र नैऋत्य मान्सून 31 मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होणार असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) स्पष्ट केलं आहे. मान्सून 1 जून रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊन त्यानंतर सात दिवसात देशात पुढं सरकतो. मात्र या वर्षी एक दिवस अगोदरचं मान्सूनचं केरळ किनारपट्टीवर आगमन होणार आहे, असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं.

नैऋत्य मान्सूनमध्ये पडतो 70 ते 90 टक्के पाऊस : देशात साधारण 1 जूनच्या नंतर मान्सून सक्रिय होतो. यावेळी मान्सून 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात नैऋत्य मान्सूनच्या बाबत 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हवामान कार्यालयानं मान्सूनबाबत महत्वाची माहिती नमूद करण्यात आली आहे. देशातील बहुतेक भाग नैऋत्य मान्सूनच्या हंगामात वार्षिक 70-90 टक्के पाऊस पडतो, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मान्सूनचा सुरुवातीचा पाऊस मे महिन्यात दक्षिण अंदमान समुद्रात पडतो. त्यानंतर मान्सून बंगालच्या उपसागरात उत्तर-पश्चिम दिशेनं पुढं सरकतो, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

मान्सूनचा 25 कोटी मजुरांच्या जीवनावर प्रभाव : देशात मान्सून सक्रिय झाल्यानंतर शेतीची कामं सुरू केली जातात. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळते. त्यासह मान्सून दाखल झाल्यानंतर कामाला सुरुवात होते. त्यामुळे मान्सून कृषी नियोजन, अन्न सुरक्षा आणि संबंधित क्षेत्रातील सुमारे 25 कोटी मजूर, कामगारांच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते." अनेक भागात मान्सूनचा कालावधी 4 महिन्यांपेक्षा अधिक आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागात मात्र हा कालावधी अर्धा होतो. भारताच्या मुख्य भूभागावर नैऋत्य मान्सूनची प्रगती केरळमध्ये प्रारंभाद्वारे नमूद करण्यात येते. त्यासह तप्त उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मान्सून दाखल झाल्यानं मोठा दिलासा मिळते. त्यामुळे मान्सूनचा नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो.

हेही वाचा :

  1. Southwest Monsoon 2023 Report : मान्सून काळात जिल्हानिहाय दैनंदिन पावसात ६० टक्के घट - रिपोर्ट
  2. Maharashtra monsoon Rain : मुंबई, ठाण्यात पावसाचा दिवसभर मुक्काम, आजही राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, जाणून घ्या कुठे आहे रेड अलर्ट
  3. Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफच्या 13 तुकड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तैनात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.