ETV Bharat / state

Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ, एनडीआरएफच्या 13 तुकड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तैनात

author img

By

Published : Jul 27, 2023, 8:53 AM IST

Updated : Jul 27, 2023, 2:11 PM IST

मुंबईत मुसळधार पाऊस
मुंबईत मुसळधार पाऊस

भारतीय हवामान विभागाने मुंबईसह पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. यासह हवामान विभागाने पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, गडचिरोली या जिल्ह्यांही रेड अलर्ट जारी केला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाण्यातील अजित पवारांचा आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

मुंबई : राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणच्या नद्यांना पूर आले आहेत. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. आज मुंबईत मुसळधार पाऊस होणार असून हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. हा रेड अलर्ट बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून ते 27 जुलै दुपारपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरी भागासाठी लागू आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने हवामान विभागाच्या हवाल्याने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान पावसाच्या रेड अलर्टमुळे ठाण्यातील अजित पवारांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या एकूण 13 तुकड्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

  • अतिवृष्टीवेळी घ्यावयाची काळजी...
    सतर्क रहा... सुरक्षित रहा!
    ---
    Precautions during heavy rains...
    Stay Alert... Stay Safe!#MumbaiRains #MyBMCUpdates pic.twitter.com/TOrEUThV6y

    — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुढचे 12 तास महत्त्वाचे : मुंबईत आज मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. त्याचबरोबर गरज असेल तरच घराबाहेर पडा,असे आवाहन सुद्धा मुंबईकरांना देण्यात आले आहे. प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे,असे आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांनादेखील आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आज उत्तर महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यात पावसाचा जोर कायम: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र वायव्य दिशेला सरकू लागले आहे. परिणामी पुढील 2 दिवस राज्यातील बहुतेक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आजसाठी कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा कायम राहणार असल्याने किनारपट्टीवरही पावसाचा जोर कायम असेल.

मुंबईत जुलै महिन्यात पावसाचा यापूर्वीचा विक्रम मोडला -जुलै 2020 मध्ये मुंबई उपनगरात (सांताक्रूझ परिसरात) 1502 मिमी पावसाची नोंद झाली. यावर्षी, 1 जुलै ते 26 जुलै 2023 पर्यंत सकाळी 8:30 पर्यंत मुंबई उपनगरात (सांताक्रूझ) 1433 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, 26 जुलै रोजी रात्री 8:30 वाजेपर्यंत मुंबई उपनगरात (सांताक्रूझ) एकूण 1557.8 मिमी पाऊस झाला आहे. अशाप्रकारे जुलै महिन्यातील पावसाचा यापूर्वीचा विक्रम मोडला गेला आहे.

मुंबई अन् उपनगरात जोरदार पाऊस: दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत मुंबईसह उपनगर आणि ठाणे जोरदार पाऊस सुरू आहे. फोर्ट, कुलाबा, नरिमन पॉइंट, एल्फिन्स्टन रोड, ग्रँट रोडसह अनेक भाग आणि अंधेरी, मरोळ, जोगेश्वरी आणि गोरेगावसह उपनगरांमध्ये 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, याच कालावधीत मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे 92.82 मिमी, 80.13 मिमी आणि 94.13 मिमी सरासरी पाऊस पडला. भारतीय हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने बुधवारी रात्री साडेआठ वाजता संपलेल्या 12 तासांत 124.8 मिमी पावसाची नोंद केली. त्याच कालावधीत सांताक्रूझ वेधशाळेत मुंबई उपनगरांमध्ये 124 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत शहरात बुधवारी दुपारी 3 ते 4 दरम्यान मुसळधार पाऊस झाला. तर सायंकाळी 6 ते 7 या वेळेत पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, बुधवारी रात्री 8 वाजेपर्यंत महानगरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले नसल्याची माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र अंधेरी आणि जोगेश्वरी रेल्वे स्थानकांदरम्यान अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे दोन वेळा वाहतुक बंद करण्यात आली होती.

हेही वाचा-

  1. Orange Alert in Mumbai : मुंबईत पावसाने जोर धरला, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
  2. Maharashtra Rains Update : आयएमडीचा 'या' आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज
Last Updated :Jul 27, 2023, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.