ETV Bharat / state

Maharashtra Rains Update : आयएमडीचा 'या' आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

author img

By

Published : Jul 25, 2023, 9:51 AM IST

Updated : Jul 25, 2023, 12:30 PM IST

मागील महिन्यात राज्यासह देशभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पुढील ४ दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

Maharashtra Wheather Update Today
महाराष्ट्र हवामान अपडेट

मुंबई : राज्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला आहे. जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग व सातारा या आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उद्या राज्यात पावसाचा जोर अजून काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

शाळेचे छत कोसळले : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील शाळेचे छत सोमवारी कोसळले. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख फैसल ताटली 25 वर्षे जुन्या उर्दू माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचे समोरचे छत दुपारी सव्वा एक वाजता कोसळले, अशी माहिती दिली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. घटना घडली तेव्हा विद्यार्थी उपस्थित नव्हते, असे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान : अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 1.42 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने सोमवारी दिली. प्राथमिक नुकसान-मूल्यांकन सर्वेक्षणाचा हवाला देत ते म्हणाले की, जिल्ह्यातील 52 पैकी 34 महसूल मंडळे प्रभावित झाली आहेत. तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. पाच गावांमध्ये बचाव कार्य सुरू आहे. जिल्ह्यातील विविध भागात या पावसात अडकलेल्या एकूण 30 जणांना एनडीआरएफ आणि स्थानिक पथकांनी वाचवले आहे. तालुका अधिकाऱ्यांना नुकसानीचे मूल्यांकन लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे ते पुढे म्हणाले.

इर्शाळवाडी येथे भूस्खलन : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे 19 जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात आपल्या कुटुंबातील पाच सदस्य गमावलेल्या एका व्यथित झालेल्या व्यक्तीने सोमवारी सांगितले की, कुजलेले मृतदेह बाहेर काढण्यापेक्षा ते ढिगाऱ्याखाली राहिलेले चांगले आहे. 65 वर्षीय कमलू पारधी यांच्या कुटुंबातील नऊ सदस्य भूस्खलनात गाडले गेले, तर केवळ चार जण या संकटातून वाचू शकले. स्थानिकांनी आणि बचाव पथकाने चौघांना बाहेर काढले.

हेही वाचा :

  1. IMD Alert Thunderstorm In Delhi : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा दिल्लीत इशारा; अनेक विमान उड्डाणे रद्द, नागरिकांना फटका
  2. Maharashtra Rain Update: कोकण आणि लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अति मुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
  3. Maharashtra Weather Today : पुणे, कोल्हापूरसह या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, विदर्भात पावसाचा धुमाकूळ
Last Updated : Jul 25, 2023, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.