IMD Alert Thunderstorm In Delhi : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा दिल्लीत इशारा; अनेक विमान उड्डाणे रद्द, नागरिकांना फटका

author img

By

Published : May 27, 2023, 7:33 AM IST

IMD Alert Thunderstorm In Delhi

दिल्लीत आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह धुळीच्या वादळाचाही दिल्लीकरांना धोका असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत अचानक बदललेल्या वातावरनाचा अनेक नागरिकांना फटका बसला आहे. त्यामुळे दिल्लीत अवकाळी पावासाचा फटका बसल्याने अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहेत. हवामान विभागाने दिल्लीसह एनसीआर परिसरात ताशी 40 ते 70 च्या वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

  • #UPDATE | A cluster of cloud patches are passing through the Delhi-NCR. Thunderstorm/ Duststorm with light to moderate intensity rain and gusty winds with speed of 40-70 km/h would continue Delhi-NCR & adjoining areas during the next 2 hours: IMD Update https://t.co/b3c6kluf59

    — ANI (@ANI) May 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ताशी 40 ते 70 च्या वेगाने वाहणार वारे : राजधानी दिल्लीत काल सायंकाळपासूनच वेगात वारे वाहत असून काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस दाखल झाला आहे. हवामान विभागाने जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला असून ताशी 40 ते 70 च्या वेगाने वारे वाहमार असल्याचेही हवामान विभागाने नमूक केले आहे. राजधानीतील वातावरण अचानक बदलल्याने नागरिकांना त्याचा जोरदार फटका बसला आहे. ताशी 40 ते 70 च्या वेगाता वारे वाहत असल्याने नागरिकांना बाहेर निघणे कठिण झाले आहे.

विमानांचे उड्डाण रद्द : दिल्लीसह एनसीआर परिसरात जोरदार वारे वाहत आहेत. त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. त्यासह या परिसरात जोरदार अवकाळी पावसाचेही आगमन झाल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले. ताशी 40 ते 70 च्या वेगात वारे वाहत असल्याने दिल्लीतीन नागरिकांना घराबाहेर निघणे कठिण झाले आहे. हवमान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दिल्लीत हवामानाचा फटका विमानसेवेलाही बसला आहे. अनेक विमान कंपन्यांनी आपल्या विमानांचे उड्डाण रद्द केल्याचे प्रवाशांना वेळेवर कळवले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. Delhi - Mumbai Railway : कोटामध्ये वादळामुळे 25000 KV रेल्वेची तार तुटली, दिल्ली-मुंबई मार्गावरील वाहतूक 8 तास ठप्प
  2. Monsoon Update : पावसाची बातमी! भारतात या दिवशी दाखल होणार मान्सून, यंदा पाऊस..
  3. Heavy Rain In Rajasthan : राजस्थानमध्ये वादळी पावसाचा कहर, 14 जणांचा मृत्यू ; हवामान विभागाने जारी केला अलर्ट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.