ETV Bharat / state

Orange Alert in Mumbai : मुंबईत पावसाने जोर धरला, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

author img

By

Published : Jul 25, 2023, 9:53 PM IST

Updated : Jul 25, 2023, 10:45 PM IST

Maharashtra Weather
कोकण किनारपट्टीला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

राज्यात आज पहाटेपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसोबतच ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : आज दिवसभराच्या उसंतीनंतर सायंकाळी पुन्हा एकदा मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारची संध्याकाळ ते सोमवारी दुपारपर्यंत उपनगरात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यांनतर आज सकाळपासून पावसाने उसंत घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढचे 24 तास मुंबई ठाण्यासह, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाच्या मुंबई विभागाने दिला आहे. या भागात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला असून, पावसाचा जोर कायम राहणार आहे.



ऑरेंज अलर्ट केला जारी : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे जिल्हा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा येथील घाट परिसरात या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मराठवाडा, परभणी, हिंगोली येथे बुधवारपर्यंत एक-दोन ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर नांदेड, लातूर जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. शुक्रवारपर्यंत विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी भंडारा, बुधवारी चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली, गुरुवारी गोंदियामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.



पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता : मंगळवारी मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. पण, दिवसभर पावसाने उसंत घेतली. आता संध्याकाळी पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, पुढचे 24 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. बुधवारपर्यंत ठाण्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे अद्ययावत इशाऱ्यानुसार ठाणे जिल्हा बुधवारपर्यंत ऑरेंज अलर्टवर आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्टवर आहेत.

हेही वाचा -

  1. Maharashtra Rains Update : आयएमडीचा 'या' आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज
  2. Kolhapur Rain Update: पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली; धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश
  3. Maharashtra Rain News: रायगड पुण्यासह आठ जिल्ह्यांना हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, कोकण पाठोपाठ विदर्भात पावसाचा हाहाकार
Last Updated :Jul 25, 2023, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.