ETV Bharat / city

New Covid Variant Omicron : नवीन विषाणूत 30 पेक्षा जास्त म्युटेशन, वेगाने पसरतो - डॉ. अविनाश भोंडवे

author img

By

Published : Nov 27, 2021, 6:27 PM IST

Updated : Nov 27, 2021, 7:57 PM IST

Dr Avinash Bhondave
डॉ. अविनाश भोंडवे

कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक म्युटेशन झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन (Omicron) हे ग्रीक नाव दिले आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरियंटच्या यादीत केला आहे. या नव्या ओमिक्रॉन विषाणूबद्दल डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondave on Omicron) यांनी अधिक माहिती दिली आहे.

पुणे - दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार हा अत्यंत संसर्गजन्य आणि चिंता वाढवणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार समितीने म्हटले आहे. कोरोनाच्या या नवीन प्रकाराला ग्रीक वर्णमालेनुसार 'ओमिक्रॉन' (New Covid Variant Omicron) असे नाव दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO on New Covid Variant Omicron) कोरोनाच्या या नव्या प्रकाराची घोषणा शुक्रवारी केली. यावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondave on Omicron) यांनी माहिती दिली आहे.

माहिती देताना डॉ. अविनाश भोंडवे

बी १.१.५२९ हा दक्षिण आफ्रिकेच्या बोसनावामधून (Omicron found in South Africa) निर्माण झालेला विषाणू हा संपूर्ण जगात चिंता निर्माण करत आहे. आता तो हाँगकाँग, बेल्जियम आणि इज्राईल या देशात पसरला आहे. हा चिंता वाढवणारा विषाणू असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या विषाणूची वैशिष्टय म्हणजे यात ३० पेक्षा जास्त म्युटेशन झाली आहेत. देशात पसरलेला डेल्टा विषाणूमध्ये फक्त दोनच व्हेरियंट होते. यात मात्र ३० म्युटेशन झाली आहेत. हा विषाणू खूप जास्त वेगाने पसरत आहे. जर भारतात हा विषाणू वेगाने पसरला तर पुन्हा लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे यावेळी डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले आहे.

  • ...म्हणून हा व्हायरस खूप वेगाने पसरतो-

ओमिक्रॉनमध्ये २ म्युटेशन अशी आहेत, ज्यामुळे हा व्हायरस खूप वेगाने पसरत आहे. हे २ म्युटेशन मानवाच्या पेशींमध्ये सहज प्रवेश करतात. या विषाणूवरील आवरण असते, त्यावर जी प्रथिने असतात ती यात सापडलेली नाहीत. म्हणून हा विषाणू जास्तीतजास्त वेगाने लोकांना संसर्गित करू शकतो, अशी शक्यता आहे. या विषाणूचा परिणाम शरीरातील अँटीबॉडीजवर होणार नाही. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना किंवा लस घेतली आहे अशांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत. अशा व्यक्तींवर या विषाणूचा परिणाम होणार नाही, असे देखील यावेळी भोंडवे म्हणाले.

  • तर तिसरी लाट निश्चित येईल -

हा विषाणू डेल्टा पेक्षाही दुपटीने वेगाने पसरेल असा अंदाज आहे. तसेच यामुळे जास्तीत जास्त हॉस्पिटलायजेशन वाढणार आहे. लोकं जास्त वेगाने गंभीर स्वरूपात आजारी पडतील. ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या देशात लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल. या विषाणूमधील लक्षणं सुरुवातीच्या कोरोना विषाणूपेक्षा फारशी वेगळी नाहीत. काही रुग्ण ही लक्षणे नसलेली देखील मिळतील. ज्यांनी लस घेतली नाही अशा लोकांनी लस घ्यावी. भारताच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. पुन्हा जनजीवन हे सुरळीत झालं आहे. अशात जर हा विषाणू वेगाने पसरला तर तिसरी लाट निश्चित येईल, असे देखील यावेळी भोंडवे म्हणाले.

  • बूस्टर डोसनंतरही संसर्ग-

कोरोनावरील लसीचा बूस्टर डोस घेतल्यानंतरही हा संसर्ग होतो, अशी घोषणा दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी गुरुवारी केली होती. आता हा विषाणू इस्रायल आणि बेल्जियम या दोन अन्य देशांमध्येही आढळून आला आहे. यापूर्वी बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्येही रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचे सुमारे १०० रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या अनेक नागरिकांचे पूर्णपणे लसीकरण झाले होते.

Last Updated :Nov 27, 2021, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.