ETV Bharat / business

अखेर जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हॅक्सिनला परवानगी

author img

By

Published : Nov 3, 2021, 6:28 PM IST

Updated : Nov 3, 2021, 9:51 PM IST

कोव्हॅक्सिन
कोव्हॅक्सिन

जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक सल्लागार ग्रुप (TAG) आहे. या सल्लागार ग्रुपने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली आहे. सध्या, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हिक्सिनच्या वैद्यकीय चाचण्यांची आकडेवारीची माहिती घेतली जात आहे.

नवी दिल्ली - जागतिक आरोग्य संघटनेने अखेर कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. कोव्हॅक्सिन ही भारत बायोटक या कंपनीने तयार केलेली पहिली स्वदेशी कोरोना लस आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा तांत्रिक सल्लागार ग्रुप (TAG) आहे. या सल्लागार ग्रुपने कोव्हॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी शिफारस केली आहे. सध्या, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोव्हिक्सिनच्या वैद्यकीय चाचण्यांची आकडेवारीची माहिती घेतली जात आहे. टॅगने 26 ऑक्टोबरला भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनची अतिरिक्त माहिती मागविली होती.

हेही वाचा-कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष

कोव्हॅक्सिनने संपूर्ण डाटा, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि उत्पादनाची गुणवत्ता याची माहिती दिली आहे. यापूर्वीच भारत बायोटेकने डाटा दिला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परवानगीबाबत 4 ते 6 आठवड्यांमध्ये निर्णय होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी जुलैमध्ये सांगितले होते. सध्याच्या घडीला जागतिक आरोग्य संघटनेने फायझर, अॅस्ट्राझेनेका सीरम, अॅस्ट्राझेनेका ईयू, जानसी, मॉर्डना आणि सिनोफार्म या लशींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी केले ट्विट-

जागतिक आरोग्य संघटनेने भारत बायोटेकच्या लशीला मान्यता दिल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्य राज् मंत्री भारती पवार यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताचे हे यशस्वी पाऊल असल्याचे राज्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे. तसेच सर्व देशातील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

  • आज WHO ने भारत बायोटेक कोवैक्सीन को मान्यता दि है। आदरणीय प्रधानमंत्री श्री. @narendramodi जी के नेतृत्व मे आत्मनिर्भर भारत की और बढ़ता हुवा ये एक सफल कदम है। सभी देशवासियों को बधाई।@mansukhmandviya

    — Dr.Bharati Pravin Pawar (@DrBharatippawar) November 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा-भारत बायोटेकच्या अंकलेश्वरमधील उत्पादन प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी

कोव्हॅक्सिन डेल्टावर ६५ टक्के प्रभावी!

दरम्यान, कोव्हॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचणीचे निष्कर्ष आणि विश्लेषणविषक माहिती भारत बायोटेकने जाहीर केली आहेत. यात त्यांनी कोरोनाच्या सामान्य लक्षणांवर ही लस 77.8 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले. तर कोरोनाच्या डेल्टा या नव्या स्वरुपावर 65 टक्के प्रभावी असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे.

हेही वाचा-कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून चालू आठवड्यात मिळणार मान्यता

Last Updated :Nov 3, 2021, 9:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.