ETV Bharat / state

भारतात कोरोना एंडेमिक स्थितीत पोहोचण्यासाठी अजून 2 ते अडीच वर्षे लागतील - डॉ.अविनाश भोंडवे

author img

By

Published : Sep 3, 2021, 8:25 PM IST

Updated : Sep 3, 2021, 8:45 PM IST

भारतातील लसीकरणाची परिस्थिती पाहता सामुदायिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी कमीत कमी दोन वर्षे तरी लागणार आहे आणि त्यानंतरच भारतात कोरोनाची एंडेमिक स्थिती तयार होईल. तोपर्यंत भारतात पहिली, दुसरी, तिसरी अशा वेगवेगळ्या लाट येतील, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

डॉ.अविनाश भोंडवे
डॉ.अविनाश भोंडवे

पुणे - जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन म्हणतात की भारतात कोरोना प्रसाराने आता एंडेमिक स्थितीत प्रवेश केला आहे. त्यांचे हे विधान संभ्रमाअवस्थेत टाकणारा विधान असून भारतात कोरोनाच्या स्थिती एंडेमिक होण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण व्हायला हवे. भारतातील लसीकरणाची परिस्थिती पाहता सामुदायिक प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी कमीत कमी दोन वर्षे तरी लागणार आहे आणि त्यानंतरच भारतात कोरोनाची एंडेमिक स्थिती तयार होईल. तोपर्यंत भारतात पहिली, दुसरी, तिसरी अशा वेगवेगळ्या लाट येतील, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

माहिती देतांना डॉ. अविनाश भोंडवे



एपिडेमिक, पॅन्डेमिक आणि एंडेमिक म्हणजे काय?

कुठल्याही साथीच्या तीन अवस्था असतात. ज्या ठिकाणी एखाद्या आजाराचे रुग्ण नेहमीपेक्षा जास्त वाढत असतात. तेव्हा त्याला साथ आली आहे म्हणजेच एपीडेमिक आली आहे, असे म्हणतो. जेव्हा ही साथ त्या भागातून एखाद्या प्रदेशाच्या, राज्याच्या तसेच देशाच्या सिमा पार करुन पुढे जात असते. तेव्हा त्याला पॅन्डेमिक म्हणत असतात आणि एंडेमिकचा अर्थ असा की काही साथी अशा असतात जे जगातील ठराविक भागातच उद्भवतात आणि इतरत्र कुठेही सापडत नाही. त्याला एंडेमिक अस म्हणतात. पॅन्डेमिकची एंडेमिक व्हायला कोणतीही साथ ही नियंत्रणात येणे गरजेचे असते. पॅन्डेमिक स्थिती कधीही लगेच आटोक्यात येत नाही. याला फक्त 2 गोष्टी अपवाद आहे. 2003 साली जी सार्सची साथ आली होती. ती आणि 2014 साली आफ्रिकेत इबोलाची साथ या दोन्ही साथी लगेच आटोक्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर कोणतीही साथ ही लगेच आटोक्यात आलेली नाही, असे भोंडवे म्हणाले.


'जास्तीत जास्त लसीकरण हा एकमेव उपाय'

आजवरच्या इतर आजारांना आळा तसेच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनतेमध्ये निर्माण होणारी हर्ड इम्युनिटी किंवा सामुदायिक प्रतिकार शक्ती या तत्वाचाच उपयोग झाला आहे. कोणत्याही देशातल्या किंवा प्रदेशातल्या जनतेत ही हर्ड इम्युनीटी फक्त दोनच गोष्टीने येऊ शकते. कोरोनाबाबत विचार केला तर हर्ड इम्युनिटी ही ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, असे लोक आणि ज्यांनी प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अशा व्यक्ती दोन्ही गटांची एकत्रित टक्केवारी भारताच्या किंवा त्या त्या प्रदेशातल्या लोकसंख्येच्या 70 टक्के एवढी झाली तर सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊन कोरोना संसर्ग वेगाने कमी होईल आणि रुग्णसंख्या अतिशय कमी होत जाईल. पण ही गोष्ट तितकी सोपी आणि सरळ नाही. भारतात साडे सात महिन्यामध्ये भारतातल्या 13 कोटी 33 लाख नागरिकांपैकी केवळ 38.2 टक्के लोकांचा एक डोस आणि फक्त 11.5 टक्क्यांचे दोन्ही लसीकरण झालेले आहे. यामध्ये अजून 18 वर्षाखालील बालके लसीकरण व्हायचे आहे. त्यामुळे भारतात जेवढे जास्त लसीकरण होईल तेवढ्या लोकांच्या प्रतिकारशक्तीत वाढ होईल. त्यामुळे प्रशासनाने जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणावर भर दिली पाहिजे, असेही डॉ. भोंडवे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - ...तर कल्पिता पिंपळे यांना आपली बोटं गमवावी लागली नसती

Last Updated :Sep 3, 2021, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.