ETV Bharat / state

'ईव्हीएम'मध्ये घोटाळा केला तर बघाच, मुख्य निवडणूक आयुक्तांना माजी मंत्र्याची धमकी - Subodh Savji Threat

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 8:48 PM IST

Subodh Savji Threat : ईव्हीएम'मध्ये घोटाळा केला तर बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. थेट खूनच करू, अशी धमकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री सुबोध सावजी यांची मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे दिली आहे. या धमकीने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Subodh Savji Threat
सुबोध सावजी (reporter)

बुलढाणा Subodh Savji Threat : राज्यासह देशभरात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा या महाविकास आघाडीला मिळणार आहेत. अशी स्थिती असताना निवडणूक आयोगाने जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला तर आपण त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 'राज्यातील सर्व मतदारांच्यावतीने मी आपला मर्डर करेल' अशी थेट धमकी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी महसूल मंत्री सुबोध सावजी यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्तांना दिली आहे. त्या संदर्भातील पत्र थेट त्यांच्या दिल्ली कार्यालयाला पाठवलं असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

सुबोध सावजी हे मुख्य निवडणूक आयुक्तांना खडसावताना (REporter)

यापूर्वीही दिल्या आहेत धमक्या : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महसूल मंत्री तथा अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी हे आपल्या विविध अनोखे आंदोलन आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांसाठी दिलेल्या धमक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. संभाजी भिडे गुरुजी जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची देखील त्यांनी मागच्या काळात धमकी दिली होती. आता पुन्हा त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांचाच गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Subodh Savji Threat
सुबोध सावजी यांचे हेच ते पत्र (REporter)

तर मी तुमचा गळा घोटेल : या संदर्भात माजी मंत्री सावजी यांनी थेट मुख्य निवडणूक आयुक्तांनाच पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात असलेला मतदाराचा कौल हा महाविकास आघाडी या पक्षांकडेच आहे. या आधारे एकूण ४८ जागांपैकी ३८ ते ४० लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारचं; परंतु जनतेच्या आणि माझ्या मनात संशय आहे की, आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा गळा घोटणार आहात. असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्यावतीनं या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही.

पत्रात नमूद केली 'ही' बाब : माझे वय सध्या ८० वर्षांचे आहे. आता १० किंवा २० वर्ष जगायचे आहे. माझ्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातील करोडो मतदारांच्या लोकशाही पध्दतीने वापरलेल्या मतदारांच्या अधिकाराचा आपण जर उघड-उघड खून करणार असाल, मुडदा पाडणार असाल तर मी या मतदारांच्या हक्काच्या सन्मानार्थ आपला मुडदा पाडेल किंवा खून करण्यास मागे पुढे पाहणार नाही. लोकशाहीच्या इतिहासात मी माझे नाव अजरामर करेल, असे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प परराज्यात, अंबादास दानवेंकडून सरकारवर आरोप - Ambadas Danve
  2. डोंबिवली घटनेवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'सरकार कारवाई नाही उलट धंदा..." - Dombivli fire Incident
  3. मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.