ETV Bharat / state

डोंबिवली घटनेवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'सरकार कारवाई नाही उलट धंदा..." - Dombivli fire Incident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 5:51 PM IST

Ambadas Danve : डोंबिवली एमआयडीसीत कोमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याच्या घटनेवरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला चांगलंच धारेवर धरलंय.

"सरकार कारवाई नाही उलट धंदा करतात"; डोंबिवलीच्या घटनेला सरकार जबाबदार असल्याची अंबादास दानवेंची टीका
"सरकार कारवाई नाही उलट धंदा करतात"; डोंबिवलीच्या घटनेला सरकार जबाबदार असल्याची अंबादास दानवेंची टीका (ETV Bharat Reporter)

अंबादास दानवे (ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर Ambadas Danve : डोंबिवली एमआयडीसीत कोमिकल कंपनीत भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झालाय. याघटनेवरुन आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकरला धारेवर धरत, असे अपघात वारंवार राज्यात होत आहेत. बॉयलर रिऍक्टर धोरण सरकारचं कामगार व औद्योगिक सुरक्षा हे खातं अकार्यक्षम आहे. नुसतं कागदावरच खातं आहे. मोठ्या मोठ्या कंपन्या याच्या अधिकाऱ्यांना गेटच्या आत देखील जाऊ देत नाहीत, त्यामुळं औद्योगिक सुरक्षा धोरणाकडं सरकारच दुर्लक्ष आहे, यात कामगारांचे बळी जातात, अनेक ठिकाणी असे अपघात होतात, याला सरकार कारणीभूत आहे असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.

सकार कारवाई करत नाही धंदा करतं : यावेळी अंबादास दानवे यांनी पुणे प्रकरणावरुनही सरकारवर टीका करत, "पुणे प्रकरणात 304 अ लावले होते. गृहमंत्री म्हणतात 304 लावले, तिथल्या पोलीस आयुक्तांचा बचाव सुरुय, पोलीस तिथं असे धंदे करतात, तिथं नियमित असे अपघात होतात 8 दिवसांपूर्वी जीएसटी अधिकाऱ्यानं असा अपघात केला. तिथल्या पोलिसांचा धंदा आहे. सरकार कारवाई करत नाही उलट धंदा करतात."


बैठकीबाबत नियोजन नाही : पुढं बोलताना अंबादान दानवे म्हाणेल, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सकाळी अचानक संभाजीनगर दौरा जाहीर केला. दुष्काळाबाबत हा दौरा असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं. मात्र मला सुद्धा आजच्या बैठकीचा निरोप सकाळी 9:30 ला आला. बैठक महत्वाची होती, म्हणूक मी मुंबईहुन रोडनं आलो. प्रशासन निवडणुकीत होते म्हणतात, दुर्लक्ष करताय. आता तरी लक्ष द्यावं. पालकमंत्री अनुपस्थितीत आहे. सकाळी निरोप दिल्यावर कसं येणार, निरोप किमान 24 तास आधी द्यावं." तसंच मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं, आज काही काम नाही चला बैठक घेऊ अस झालं. आता बैठक वांझोटी होते की कशी होते असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.



राज्यात येणारी गुंतवणूक जाते कशी : राज्यात येणारी नवी गुंतवणूक गेली कुठं असा प्रश्न विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारची ट्रेकिंग बनवणाऱ्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट राज्यातून मध्यप्रदेशात गेली कशी, त्यांनी राज्य सरकारला प्रकल्प सुरु करण्याबाबत विचारणा केली होती. मात्र, राज्य सरकारनं पाठपुरावा केला का? याच उत्तर राज्य सरकारनं द्यावं, की दबाव टाकून कंपनी तिकडे नेली? मोठी गुंतवणूक संभाजीनगर किंवा महाराष्ट्रात झाली असती, पण राज्य सरकारची बेपवाई आहे असा आरोप दानवे यांनी केलाय.

हेही वाचा :

  1. डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; चार ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Dombivli MIDC Blast
  2. मुंबईतील मतदानाची टक्केवारी घटण्यास जबाबदार कोण?; भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.