ETV Bharat / state

यवतमाळ : शासकीय लाभ मिळावा यासाठी फासेपारधी बांधवांची 19 किलोमीटरची 'अंधारयात्रा'

author img

By

Published : Nov 4, 2021, 10:00 AM IST

Updated : Nov 4, 2021, 10:31 AM IST

andharyatra by pardhi comunity in yavatmal
andharyatra by pardhi comunity in yavatmal

शासनाकडून कागदपत्रांच्या आडकाठी उभ्या करून या घटकाला योजनांपासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळेच त्याचा लाभ मिळावा, यासाठी 19 किलोमीटर दूर असलेल्या किटा या गावातून अंधारयात्रा कडून फासेपारधी बांधव, महिला चिमुकल्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

यवतमाळ - फासे पारधी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. शासनाच्या योजना असूनही त्यांना लाभ घेता येत नाही. त्यामुळे मूलभूत सुविधा पासूनही देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात फासेपारधी समाज वंचित आहे. शासनाकडून कागदपत्रांच्या आडकाठी उभ्या करून या घटकाला योजनांपासून दूर ठेवले जात आहे. त्यामुळेच त्याचा लाभ मिळावा, यासाठी 19 किलोमीटर दूर असलेल्या किटा या गावातून अंधारयात्रा कडून फासेपारधी बांधव, महिला चिमुकल्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. संविधानाने फासेपारधी यांना दिलेल्या अधिकारासाठी मतीन भोसले यांनी लढा उभा केला आहे.

प्रतिक्रिया

'उपेक्षित जीवन जगावे का?' -

फासे पारधी समाजात भूमीहीन आहे. त्यामुळे महानगरात, शहरात जाऊन भीक मागून आपले जीवन जगत आहे. अनेक परधीबेड्या पर्यंत वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधाही अद्यापपर्यंत पोहोचल्या नाहीत. सर्वजण दिवाळी हा उत्सव साजरा करत असताना फासेपारधी समाज हा आजही अंधारच आहे. त्यामुळेच या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंधारयात्रा काढण्यात आली. यावेळी प्रत्येक पारधी बेड्यावर्ती अंगणवाडीसेविका, शेतजमिनीचे पट्टे, दहा वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या पारधी कड्यावरील कुटुंबांना गाव नमुना, आठ 'अ' चे दाखले देण्यात यावे, शासकीय अनुदानातून घरकूल देण्यात यावे, पारधी बेड्यावरील मुलांना जात प्रमाणपत्र द्यावे, आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत स्वयंरोजगार सुरू करण्यात यावा, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

हेही वाचा - Diwali 2021 : आज लक्ष्मीपूजन! 'ही' आहे पुजेची योग्य वेळ, लक्ष्मी होईल प्रसन्न...

Last Updated :Nov 4, 2021, 10:31 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.