ETV Bharat / city

Diwali 2021 : आज लक्ष्मीपूजन! 'ही' आहे पुजेची योग्य वेळ, लक्ष्मी होईल प्रसन्न...

author img

By

Published : Nov 4, 2021, 6:01 AM IST

diwali 2021
diwali 2021

हिंदू धर्मात दिवाळी हा सण आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. लोक मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी गणेशासह लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

हैदराबाद - हिंदू धर्मात दिवाळी हा सण आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. लोक मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात. हिंदू कॅलेंडरनुसार, दिवाळी हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी गणेशासह लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात लक्ष्मीला सुख, समृद्धी आणि संपत्तीची देवी मानले जाते. दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीजी प्रसन्न होऊन तिला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. या दिवशी श्रीगणेश आणि माता लक्ष्मीसोबत धनाचे देवता कुबेराचीही पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, रावणाचा वध करून भगवान राम माता सीतेसह अयोध्येत परतले. प्रभू राम परतल्यानंतर संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी सजली होती. दिवाळीच्या दिवशी लोक घरात दिवे लाऊन देवी लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीपूजन प्रामुख्याने रात्री केले जाते.

  • काय आहेत लक्ष्मीपुजनाच्या वेळा -

दिवस : गुरुवार, ०४ नोव्हेंबर

सूर्योदय - 06:21 AM

सूर्यास्त- 06:07 PM

अमावस्या - सकाळी 06:03 ते 02:44 (05 नोव्हेंबर)

राहुकाल - दुपारी 01:33 ते 02:59 pm

योग - प्रीती आणि आयुष्मान

  • लक्ष्मी-गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त

पहिला मुहूर्त प्रदोष काल- 05:47 ते 08:20 PM

दुसरा मुहूर्त वृषभ लग्न काल- 06:24 ते 08:22 PM

तिसरा मुहूर्त निशीत काल- 23:39 ते 05 नोव्हेंबर सकाळी 10 पर्यंत

  • कुबेराचीही करतात पुजा -

प्राचीन काळातील उपलब्ध असलेल्या संदर्भानुसार अगोदर रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु, गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत.

हेही वाचा - दिवाळीतील पारंपारिक फराळात बदल; ड्रायफ्रुट्स, मिठाई आणि चॉकलेट्सची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.