ETV Bharat / entertainment

अनसूया भारद्वाजच्या वाढदिवसानिमित्त 'पुष्पा 2'मधील फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - anasuya bharadwaj first look poster

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 1:31 PM IST

Anasuya bharadwaj first look poster : अल्लू अर्जुन अभिनीत 'पुष्पा 2 द रुल'मधील अनसूया भारद्वाजचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. आज अनसूयाचा वाढदिवस आहे.

Anasuya bharadwaj first look poster
अनसूया भारद्वाजचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज (अनसूया भारद्वाज(Mythri Movie - X handle))

मुंबई- Anasuya bharadwaj first look poster : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2 द रुल' ची वाट चाहते आतुरतेनं पाहत आहेत. नुकतेच 'पुष्पा-पुष्पा' चित्रपटामधील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या चित्रपटामधील हे गाणं सोशल मीडियावर हिट झालं. या गाण्यावर अनेकांनी रिल्स तयार केले आहेत. दरम्यान या चित्रपटातील अभिनेत्री अनसूया भारद्वाजचा फर्स्ट लूक समोर आला आहे. अनसूयाचा फर्स्ट लूक तिच्या वाढदिवशी शेअर करण्यात आला आहे. 'पुष्पा 2', मैत्री मूव्ही मेकर्सच्या निर्मात्यांनी अनसूयाला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनसूया तिचा 39 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या खास प्रसंगी, 'पुष्पा'च्या निर्मात्यांनी मैत्री मूव्हीनं त्यांच्या एक्स हँडलवर चित्रपटातील अनसूयाचा जबरदस्त लुक शेअर करून चाहत्यांना सुंदर भेट दिली आहे.

अनसूया भारद्वाजचा फर्स्ट लूक रिलीज : अनसूयाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये, अनसूया टेबलावर बसून दबंग स्टाईलमध्ये दिसत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात धनसूची भूमिका तिनं साकारली होती. तिचा या चित्रपटामधील अभिनय अनेकांना आवडला होता. 'पुष्पा 2: द रुल'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, अनसूया भारद्वाज, सुनील, प्रकाश राज, जगदीश, विजय सेतुपती आणि राव रमेश महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलं आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी केलंय.

चित्रपटाचे दुसरे गाणे कधी होईल रिलीज :' पुष्पा-पुष्पा' चित्रपटामधील पहिलं गाणं हिट झाल्यानंतर आता चित्रपटाचं दुसरे गाणे रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 'पुष्पा 2'चं दुसरे गाणं एक रोमँटिक ट्रॅक असल्याचं सांगितलं जात आहे. या गाण्यात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची लव्ह केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. 'पुष्पा 2: द रुल' हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, बंगाली, मल्याळम आणि तामिळ या भाषांमध्ये रिलीज होईल. 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाकडून निर्मात्यांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या भागाला जबरदस्त यश मिळ्यानंतर, दुसरा भाग देखील खूप धमाकेदार असेल अशी अपेक्षा चाहते करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'सरफरोश'ची 25 वर्षे : नवाजुद्दीन सिद्दीकीनं शेअर केला आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव - 25 years of Sarfarosh
  2. कियारा अडवाणी आणि ऐश्वर्या राय बच्चन कान फेस्टिव्हलसाठी रवाना - KIARA ADVANI AND AISHWARYA RAI
  3. भावड्या 36 वर्षातही बदलला नाही : विकी कौशलला वाढदिवसानिमित्त सनीनं दिल्या हटके शुभेच्छा! - Vicky Kaushal Birthday
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.