ETV Bharat / entertainment

भावड्या 36 वर्षातही बदलला नाही : विकी कौशलला वाढदिवसानिमित्त सनीनं दिल्या हटके शुभेच्छा! - Vicky Kaushal Birthday

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 10:00 AM IST

Updated : May 16, 2024, 12:43 PM IST

Vicky Kaushal Birthday : सनी कौशलनं मोठा भाऊ विकी कौशलला त्याच्या 36व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या 36 वर्षात विकीमध्ये काहीही बदलल झालेला नाही हे दाखवून देण्यासाठी सनीने त्याचा लहानपणीचा आणि आताचा फोटो शेअर केला आहे.

Vicky Kaushal Birthday
विकी कौशल वाढदिवस (Sunny Kaushal Instagram)

मुंबई - Vicky Kaushal Birthday : अभिनेता विकी कौशल आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी त्याला खास शुभेच्छा देताना त्याचा भाऊ सनी कौशलने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्याने इंस्टाग्रामवर त्याचा एक लहानपणीचा आताचा फोटो शेअर केला आहे. पहिला फोटो विकीच्या लहानपणीचा असून दुसऱ्या फोटोत तो मोठा दिसत असून वाढदिवसाचा केक कापण्याच्या तयारीत दिसत आहे.

हे दोन फोटो शेअर करताना सनी कौशलनं कॅप्शनमध्ये "३६ सालों में जादा तो कुछ नहीं बदला..." असं लिहित त्यानं विकीला क्युटी म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सनीने फोटो पोस्ट करताच अभिनेता विकी कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली. पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका सोशल मीडिया युजरने लिहिले: "माझ्या आवडत्या स्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा." वाढदिवसाच्या सर्व शुभेच्छांव्यतिरिक्त, अनेकांनी सांगितले की ते सर्वजण' छावा' चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.

'छावा' चित्रपटाबद्दल सांगायचे तर, विकीने नुकतेच चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. या चित्रपटात तो पहिल्यांदाच अभिनेत्री रश्मिका मंदान्ना बरोबर काम करत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे.

'छावा' या ऐतिहासिक चित्रपटात विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिकानं त्यांच्या पत्नी येसूबाई भोंसले यांची भूमिका केली आहे. दिनेश विजन यांच्या नेतृत्वाखालील मॅडॉक फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलाचा जलवा, दीपिका पदुकोणच्या लूकची करुन दिली आठवण - urvashi rautela
  2. लोकआग्रहास्तव सचिवची फुलेरा वापसी : 'पंचायत सीझन 3' च्या ट्रेलरने इंटरनेटवर वादळ - Panchayat Season 3
  3. बॉलिवूडमधील पाच सुंदर अभिनेत्रींचा घायाळ करणारा लूक - 5 Bollywood Actress hot look
Last Updated :May 16, 2024, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.