ETV Bharat / entertainment

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेलाचा जलवा, दीपिका पदुकोणच्या लूकची करुन दिली आठवण - urvashi rautela

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 5:40 PM IST

Urvashi Rautela at Cannes Film Festival 2024 : कान फिल्म फेस्टिव्हल 2024चा कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमामध्ये आता अनेक स्टार्स हजेरी लावताना दिसत आहेत. दरम्यान उर्वशी रौतेलानं गुलाबी गाऊन परिधान करून दीपिका पदुकोण लूकची कॉपी केल्याचं दिसत आहे.

Urvashi Rautela at Cannes Film Festival 2024
उर्वशी रौतेला कान फिल्म फेस्टिव्हल 2024 (Etv Bharat)

मुंबई - Urvashi Rautela at Cannes Film Festival 2024 : कान फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू झाला आहे. हा सोहळा 24 मे पर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री उर्वशी रौतेला ही या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात सहभागी झाली होती. आता तिनं रेड कार्पेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती अनोख्या अवतारात दिसत आहे. 14 मेपासून सुरू झालेल्या कान फिल्म फेस्टिव्हलध्ये उर्वशी रौतेलानं दीपिका पदुकोणच्या लूकची आठवण करून दिली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं कान फिल्म फेस्टिव्हल 2018 मध्ये असाच गाऊन परिधान केला होता.

उर्वशी रौतेलाचा कान फिल्म फेस्टिव्हलमधील लूक : उर्वशी रौतेलाच्या कान फेस्टिव्हलच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिनं डीपनेक हाय स्लिट गुलाबी गाऊन घातला होता. याशिवाय तिनं डोक्यावर स्टोन जडलेला एक बॅन्ड परिधान केला , तर तिनं हातात अशाप्रकारचे ब्रेसलेट घातले होते. उर्वशीनं चेहऱ्यावर शार्प मेकअप केला होता आणि कानात लांब झुमकेही घातले होते. कान फिल्म फेस्टिव्हलबद्दल बोलायचं झालं तर, या सोहळ्यात जगभरातील स्टार्स सहभागी होत आहेत. दरवर्षी हा उत्सव फ्रान्समध्ये होतो, जिथे अनेक चित्रपटही दाखवले जातात. समारोप समारंभात विजेत्यांचीही घोषणा केली जाते. यावर्षी 22 चित्रपटांमध्ये शर्यत आहेत.

कान फेस्टिव्हलमध्ये कुठले बॉलिवूड स्टार्स झळकणार : भारतीय सेलिब्रिटींबद्दल बोलायचं झालं साऊथ अभिनेत्री शोभिता धुलिपालापासून कियारा अडवाणीपर्यंत सर्वजण या वर्षी कानमध्ये पदार्पण करणार आहेत. अदिती रॉय हैदरी दुसऱ्यांदा रेड कार्पेटवर झळकणार आहे. ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा कान फेस्टिव्हलमध्ये आपल्या सौंदर्याची जादू पसरविताना दिसणार आहे. आता अनेक चाहते या स्टार्सला पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. दरम्यान उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'ब्रो' तेलुगू या चित्रपटामध्ये दिसली होती. आता पुढं ती 'ब्लॉक रोज' आणि 'जेएनयू: जहांगीर नेशनल यूनिवर्सिटी'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन'मधील भन्नाट पोस्टर केलं रिलीज - Kartik aaryan
  2. माधुरी दीक्षितची सुनील शेट्टीपासून करिश्मा कपूरपर्यंत 'धक धक' वाढवणारी रील्स - Madhuri Dixit birthday
  3. कीर्ती सुरेश आणि राशी खन्नाच्या एअरपोर्ट लूकनं वेधलं नेटिझन्सचं लक्ष - Keerthy Suresh Airport look
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.