ETV Bharat / sports

IND Vs SA : आफ्रिकेला चौथा धक्का, बावुमा आऊट

author img

By

Published : Oct 4, 2019, 10:51 AM IST

Updated : Oct 4, 2019, 12:56 PM IST

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यावर भारताने आपली पकड घेतली आहे. शुक्रवारी तिसऱया दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर इशांत शर्माने एक बळी घेतल्यानंतर, आफ्रिकेची अवस्था 4 बाद 92 इतकी झाली आहे .

भारत आणि दक्षिण आफ्रिका कसोटी सामना

विशाखापट्टणम - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली बाजू मजबूत केली आहे. आफ्रिकेसमोर 502 धावांचा डोंगर उभारल्या नंतर गुरूवारी भारतीय गोलंदाजांनी आफ्रिकेच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले होते. शुक्रवारी खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिल्याच सत्रात इशांत शर्माने टेंबा बावुमा यास पायचित करत, आफ्रिकेच्या धावगतीला ब्रेक लावला आहे.

हेही वाचा... India Vs South Africa : दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला..भारताची सामन्यावर पकड, आफ्रिका ३ बाद ३९

गुरूवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेची अवस्था 3 बाद 39 अशी झाली होती. आर. अश्विनने इडन मार्क्रम (५) आणि थेनीस डी ब्रुन (४) यांना बाद करत तर जाडेजाने नाईट वॉचमन डेन पीट याला शून्यावर बाद करत आफ्रिकेला अडचणीत आणले होते. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर फाफ ड्यू प्लेसिस आणि टेंबा बावुमा यांनी सावध सुरूवात केली. मात्र इशांत शर्माने बावुमाला (18) पायचीत करत हि जोडी फोडली. यामुळे आफ्रिकेची अवस्था 3 बाद 39 वरून 4 बाद 92 झाली आहे.

हेही वाचा... VIDEO: कसोटीत मयांक अग्रवालचे पहिले शतक, सहकाऱ्यांनी 'अशा'पध्दतीने केलं अभिनंदन

Intro:Body:Conclusion:
Last Updated :Oct 4, 2019, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.