ETV Bharat / bharat

रेमल चक्रीवादळामुळं 'सिटी ऑफ जॉय'च्या आनंदात विरजण - Cyclone Remal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 3:17 PM IST

Cyclone Remal: चक्रीवादळ रेमलनं कोलकातामधील अनेक भाग उद्ध्वस्त केला आहे. अनेक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले. या काळात जोरदार पाऊस झाला. रस्त्यांवर पाणी साचलेलं दिसून आलं. यावेळी मदत आणि बचाव पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

Cyclone Remal
रेमाल चक्रीवादळ कोलकात्यावर धडकले (IANS)

कोलकाता Cyclone Remal: 'रेमल' या चक्रीवादळाच्या आगमनानंतर कोलकात्यात मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यानं थैमान घातलं. चक्रीवादळामुळं शहरातील विविध भागात झाडं उन्मळून पडलेली आहेत. कोलकाता महानगरपालिका, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकामार्फत त्यांना उचलण्याचं काम सुरू आहे. पावसात देखील कामगार रात्री उशिरापर्यंत रस्ते मोकळे करण्याचं काम करत होते.

दक्षिण कोलकाता कलेक्टर प्रियव्रत रॉय म्हणाले की, रेमलमुळं शहरातील विविध भागातील झाडं पडली असून कोलकाता नगरपालिकेचं पथक, पोलीस आणि व्यवस्थापनामार्फत रस्ते सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. सकाळपर्यंत या कामाला यश येईल असं त्यांनी सांगितलं.

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा विशेष एकात्मिक नियंत्रण कक्ष रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. पालिकेमार्फत नियंत्रण कक्षही उभारण्यात आला होता. पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशाच्या किनारपट्टी तसंच तेथील मोंगलाच्या नैऋत्येकडील सागरी बेट आणि खेपुपारा दरम्यान रविवारी रात्री 8.30 वाजता पावसामुळे तसंच 'रेमल' वादळामुळं कच्चं बांधकाम असलेली घरं उद्धस्त झाली. झाडं उन्मळून पडली. त्यामुळं नागरिकाना त्रास सहन करावा लागला.

वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 किलोमीटर इतका होता. त्यानंतर त्याचा वेग ताशी 135 किलोमीटर इतका झाला. राजभवनाच्या बाहेरून काढलेल्या फोटोंमध्ये राजधानीत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहत असल्याचं दिसत होतं. चक्रीवादळाविषयी बोलताना, हवामान विभाग कोलकाता येथील पूर्व विभाग प्रमुख सोमनाथ दत्ता म्हणाले, 'बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची प्रक्रिया रात्री 8:30 वाजता सुरू झाली.

रात्री 10:30 वाजताच्या निरीक्षणावरून असं दिसून येतं की, पडझड सुरूच होती. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत असंच सुरू होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थांनी 'रेमल' चक्रीवादळच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती पश्चिम बंगाल सरकारच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. सर्व मच्छिमारांना बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा

  1. चक्रीवादळ 'रेमाल' सोमवारी पहाटे पश्चिम बंगालला धडकणार; मुसळधार पावसाला सुरुवात, NDRF पथकं तैनात - Cyclone Remal Landfall
  2. तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; मुसळधार पावसानं वंदे भारतसह अनेक रेल्वे रद्द, विमानसेवा विस्कळीत, आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.