ETV Bharat / bharat

चक्रीवादळ 'रेमाल' सोमवारी पहाटे पश्चिम बंगालला धडकणार; मुसळधार पावसाला सुरुवात, NDRF पथकं तैनात - Cyclone Remal Landfall

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 12:20 PM IST

Updated : May 26, 2024, 9:18 PM IST

Cyclone Remal Landfall Warning : चक्रीवादळ 'रेमल' आज (26 मे) पश्चिम बंगालला धडकण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वात मोठा परिणाम पश्चिम बंगाल, तटीय बांगलादेश, त्रिपुरा आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Cyclone Remal Landfall Warning
चक्रीवादळ 'रेमाल' आज पश्चिम बंगालला धडकणार, ईशान्य प्रदेशासाठी इशारा जारी (Source ETV Bharat)

कोलकाता(पश्चिम बंगाल) Cyclone Remal Landfall : हवामान खात्यानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 'रेमल' चक्रीवादळ रविवारी पश्चिम बंगालमध्ये दाखल झालं आहे. या पार्श्वभूमीवर ईशान्येकडील प्रदेश आणि बांगलादेशसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रेमाल चक्रीवादळामुळं बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात अत्यंत मुसळधार पाऊस आणि जोरदार वारं वाहू लागले आहे. आंध्र प्रदेशच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, खोल दाबाचे उत्तर आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर 'रेमल' चक्रीवादळात रूपांतर झालं.

मुसळधार पाऊस, जोरदार वारं सुरू : पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात पाणी साचले आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. राज्यात विविध ठिकाणी NDRF, SDRF पथकं तैनात करण्यात आली आहेत. समुद्री किनाऱ्याजवळ न थांबण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. रेमाल चक्रीवादळ परिस्थितीवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. जोरदार वारं वाहत असून, अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. काही रेल्वे स्टेशनवर तर चक्क रेल्वे गाड्या साखळीने बांधल्या आहेत.

हवामान खात्यानं म्हटलंय की, " 26 मे रोजी सकाळी वायव्येकडं आणि लगतच्या ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि बांगलादेश आणि सागर बेट आणि खेपुपारा दरम्यानच्या आसपासच्या भागात ते जवळजवळ उत्तरेकडं सरकण्याची आणि तीव्र चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. तसंच ते पश्चिम बंगालचा किनारा ओलांडण्याची शक्यता असून 26 मे च्या मध्यरात्री ते ताशी 110-120 ते 135 किमी वेगानं वाऱ्यासह तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल."

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावरील खोल दाब गेल्या 6 तासांत 12 किमी प्रतितास वेगानं उत्तरेकडं सरकलंय. 25 मे रोजी संध्याकाळी 5.30 वाजता त्याचं 'रेमल' चक्रीवादळात रूपांतर झालं. त्याचे केंद्र उत्तर आणि लगतच्या पूर्व मध्य बंगालच्या उपसागराच्या जवळ आले. आयएमडीच्या अंदाजानुसार चक्रीवादळाची ताकद वाढतच जाईल. त्यामुळे मुसळधार पाऊस, जोरदार वारं आणि वादळाचा धोका निर्माण होईल.

21 तासांसाठी फ्लाइट स्थगित : कोलकाता विमानतळ प्राधिकरणानं शनिवारी रेमल चक्रीवादळामुळं 21 तासांसाठी फ्लाइट ऑपरेशन स्थगित करण्याची घोषणा केली. रेमल चक्रीवादळाचा कोलकातासह पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर झालेला प्रभाव पाहता संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेण्यात आली. 26 मे रोजी सकाळी 12 ते 27 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत (IST) फ्लाइट ऑपरेशन्स स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला य. कोलकाता विमानतळ प्राधिकरणानं एका निवेदनात म्हटलंय की, कोलकातात जोरदार वारं आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

रेमाल चक्रीवादळाचा कोलकाता शहरासह पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. एनडीआरएफचे निरीक्षक झहीर अब्बास म्हणाले की, "ते चक्रीवादळासाठी पूर्णपणे तयार आहेत. येथे चक्रीवादळ आले तर आमचे सैनिक प्रत्येक प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. आमची टीम पूर्णपणे सज्ज आहे. आमची टीम झाड पडणे किंवा पूर बचाव इत्यादीसाठी सज्ज आहे. आम्ही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत."

28 तारखेपर्यंत प्रभाव : पश्चिम बंगाल, किनारी बांगलादेश, त्रिपुरा आणि ईशान्येकडील काही इतर भाग प्रभावित होणारे प्राथमिक भाग आहेत. अधिकाऱ्यांनी या भागातील रहिवाशांना 26 मेपासून सुरू होणाऱ्या प्रतिकूल हवामानासाठी तयार राहण्याचं आवाहन केलंय. आयएमडीनं म्हटलंय की, चक्रीवादळ रेमलसाठी सध्याची चेतावणी 28 मे पर्यंत प्रभावी आहे, परंतु परिस्थिती आवश्यक असल्यास ती वाढविली जाऊ शकते.

हेही वाचा -

  1. तामिळनाडूत पावसाचा हाहाकार; मुसळधार पावसानं वंदे भारतसह अनेक रेल्वे रद्द, विमानसेवा विस्कळीत, आज सार्वजनिक सुट्टी जाहीर
  2. दक्षिण भारतात कहर करणाऱ्या चक्रीवादळाला 'मिचॉन्ग' हे नाव कोणी दिलं, त्याचा अर्थ काय?
  3. तामिळनाडूला मिचॉन्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, जनजीवन विस्कळीत
Last Updated : May 26, 2024, 9:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.