ETV Bharat / sports

VIDEO: कसोटीत मयांक अग्रवालचे पहिले शतक, सहकाऱ्यांनी 'अशा'पध्दतीने केलं अभिनंदन

author img

By

Published : Oct 3, 2019, 1:54 PM IST

पहिल्या दिवशी मयांक ८४ धावांवर नाबाद होता. आज खेळ सुरू झाल्यानंतर मयांकने संयमी खेळी करत शतक झळकावले. शंभरावी धाव घेताच मयांकने हवेत उडी घेत आनंद साजरा केला. तेव्हा ड्रेसिंग रुममधील सर्व सहकाऱ्यांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. मयांकचे हे पहिले शतक आहे.

VIDEO: कसोटीत मयांक अग्रवालचे पहिले शतक, सहकाऱ्यांनी 'अशा'पध्दतीने केलं अभिनंदन

विशाखापट्टणम - भारताने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या पहिला कसोटी सामन्यात, रोहित-मयांक जोडीच्या त्रिशतकी सलामीच्या जोरावर सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. पहिल्या (बुधवार) दिवशी रोहित शर्माने नाबाद शतक झळकावले. तर दुसऱ्या दिवशी रोहित पाठोपाठ मयांक अग्रवाल यानेही कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. मयांकने शंभरावी धाव घेताच ड्रेसिंग रुममधील सर्व सहकाऱ्यांनी स्टॅडिंग ओव्हेशन दिले.

पहिल्या दिवशी मयांक ८४ धावांवर नाबाद होता. आज खेळ सुरू झाल्यानंतर मयांकने संयमी खेळी करत शतक झळकावले. शंभरावी धाव घेताच मयांकने हवेत उडी घेत आनंद साजरा केला. तेव्हा ड्रेसिंग रुममधील सर्व सहकाऱ्यांनी उभे राहून त्याचे अभिनंदन केले. कसोटीत मयांकचे हे पहिले शतक आहे.

हेही वाचा - IND VS SA : रोहित-मयांकची जोडी जमली रे.., सेहवाग-गंभीरचा १५ वर्षांपूर्वीचा मोडला विक्रम

आफ्रिकेविरुध्द सुरू असलेल्या कसोटीत रोहित-मयांकच्या जोडीने, आफ्रिकन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. एकीकडून रोहितने आक्रमक पावित्रा घेतला होता. तर दुसरीकडे मयांकने संयमी खेळी करत आफ्रिकन गोलंदाजांच्या तोंडाचे पाणी पळवले.

दरम्यान, मयांक गेल्या वर्षभराच्या काळात कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी या वर्षी ऋषभ पंत, पृश्वी शॉ, रवींद्र जडेजा आणि हनुमा विहारी यांनी शतक झळकावले आहे.


हेही वाचा - रोहित शर्मा : आयसीसीच्या क्रिकेट इतिहासात 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.