ETV Bharat / snippets

शेअर ट्रेडिंगमध्ये नफ्याचं अमिष दाखवून 1.07 कोटींची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरू

Share Trading Fraud
Share Trading Fraud (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 3:40 PM IST

Share Trading Fraud ठाणे : नवी मुंबई येथील एका 48 वर्षीय व्यक्तीला शेअर ट्रेडिंगचं आमिष दाखवून चांगल्या परताव्याच्या आमिषानं 1.07 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. फसवणूक करणाऱ्यांनी 13 फेब्रुवारी ते 5 मे दरम्यान खारघर येथील पीडित तरुणाशी संपर्क साधला. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळेल असं आमिष दाखवलं आणि वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितलं. या व्यक्तीनं विविध बँक खात्यांमध्ये 1,07,09,000 रुपये भरले. जेव्हा त्यानं गुंतवलेल्या पैशाचा परतावा मागितला पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फसवणूक झाल्याचं समजताच त्यानं पोलिसांकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कलम 419, 420 आणि 34 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केलाय.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.