सायन हॉस्पिटलच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कारखाली महिला चिरडली; घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर - Sion Hospital Accident

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 2:36 PM IST

Updated : May 27, 2024, 5:21 PM IST

thumbnail
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर (Source ETV Bharat)

मुंबई Mumbai Sion Hospital Accident Case : सायन हॉस्पिटलच्या आवारात शुक्रवारी (24 मे) हॉस्पिटलचे डॉ. राजेश डेरे यांच्या कारनं धडक दिल्यानं एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर याप्रकरणी रुग्णालयाच्या फॉरेन्सिक मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांना भोईवाडा न्यायालयानं जामीन मंजूर केला. अगोदर राजेश डेरे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्यानंतर त्यांची 20 हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. त्यामुळं या घटनेवरुन सर्व स्तराहून संताप व्यक्त करण्यात येत होता. असं असतानाच आता या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलय. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, महिला हॉस्पिटलच्या आवारात झोपलेली असताना तिच्या अंगावरुन डॉक्टरची कार गेल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळं या प्रकरणी आता कडक कारवाई करण्यात येणार का, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

Last Updated : May 27, 2024, 5:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.