ETV Bharat / entertainment

केकेआरनं ट्रॉफी जिंकल्यावर बॉलीवूडमध्ये जल्लोष, करण जोहरसह 'या' स्टार्सनी केलं अभिनंदन - IPL 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 2:51 PM IST

शाहरुख खानची टीम केकेआरनं आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकली आहे. त्यानंतर आता 'किंग खान'वर बॉलिवूडमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

KKR won the IPL 2024
केकेआरने जिंकली आयपीएल 2024 ट्रॉफी ((IMAGE- IANS))

मुंबई - बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीग 2024 ची ट्रॉफी जिंकल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. 26 मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या 2024च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर शाहरुख खानवर चित्रपटसृष्टीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यामध्ये शाहरुख खानचा खास मित्र करण जोहरपासून ते आयपीएल टीम पंजाबची मालकीण आणि अभिनेत्री प्रिती झिंटानेही त्याचं अभिनंदन केलं आहे.

आयपीएल पंजाब संघाची मालकीण प्रिती झिंटानं तिच्या सोशल मीडिया हँडलवर,'केकेआरने आयपीएल 2024 ट्रॉफी जिंकल्याबद्दल अभिनंदन' असं लिहिलं आहे. आयपीएल 2024 ट्रॉफी जिंकल्याबद्दल शाहरुख खान आणि जुही चावला यांचं प्रितीनं अभिनंदन केलं आहे. तुमचा संघ संपूर्ण आयपीएलमध्ये चांगला खेळला. तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावल्याबद्दल प्रितीनं शाहरुखचं खास अभिनंदन केलं आहे.

KKR ने IPL 2024
कार्तिक आर्यनची पोस्ट (Instagram)

केकेआरच्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये शाहरुख खानचा खास मित्र आणि चित्रपट निर्माता करण जोहरही सहभागी झाला आहे. करण जोहरने त्याच्या इंस्टास्टोरीवर शाहरुख खानचा एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, 'लव्ह यू ब्रदर.'

KKR ने IPL 2024
रणवीर सिंगची पोस्ट (Instagram)

रणवीर सिंग, कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर यांनी देखील शाहरुख खानची टीम केकेआर ने आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले होते. सध्या ही जोडी त्यांचा आगामी चित्रपट मिस्टर अँड मिसेस माहीचे प्रमोशन करण्यात गुंतले आहेत.

KKR ने IPL 2024
करण जोहरची पोस्ट (Instagram)

सुहाना खानची मैत्रिण अनन्या पांडे आणि शनाया कपूर देखील स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. याशिवाय चंकी पांडे आणि संजय कपूर हे देखील केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील विजेतेपदाचा सामना पाहण्यासाठी चेन्नई चेपॉक स्टेडियमवर आले होते.

हेही वाचा -

केकेआरनं आयपीएलची ट्रॉफी उचलताच 'मिस्टर आणि मिसेस माही'चा स्टेडियमवर जल्लोष - IPL 2024

'केकेआर'च्या विजयानंतर शाहरुख खानचं कुटुंब झालं भावूक, बाप लेकीच्या डोळ्यात आनंदाश्रू - IPL 2024 Final

अनंत-राधिका प्री-वेडिंग फंक्शनसाठी सलमान खान रणबीर, आलिया आणि धोनीसह इटलीला रवाना - Anant Radhika Pre Wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.