ETV Bharat / city

Maharashtra Metro Rail Corporation : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक

author img

By

Published : Jan 28, 2022, 9:43 PM IST

Updated : Jan 28, 2022, 11:39 PM IST

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशी माहिती CGST नवी मुंबई यांनी दिली आहे.
GST evasion
GST evasion

मुंबई - महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला 9 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अशी माहिती CGST नवी मुंबई यांनी दिली आहे. (Maharashtra Metro Rail Corporation) या कंत्राटदारावर 9 कोटी रुपयांचा जीएसटी चोरी केली असल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नागपूर येथे मेट्रो ट्रेन पिंपरीचे बांधकामासाठी काँट्रॅक्ट देण्यात आले होते.

मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 2016 कंत्राट दिले

2016 मध्ये हे कंत्राट जीएसटी 9 कोटीची थकबाकी केल्यामुळे प्रकरणी मेसर्स प्रतिभा सीएसएल सुधीर कन्स्ट्रक्शन्सच्या एका संचालकाला अटक करण्यात आली आहे. (Metro Rail Corporation contractor arrested for GST evasion) महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 2016 मध्ये या कंपनीला मेट्रो ट्रेन डेपोचे कंत्राट दिले. त्यावेळी कंपनीने 8.05 कोटी रुपयांचा जीएसटी भरना केला नव्हता. त्यामुळे कंत्राट मिळाल्याच्या दोन वर्षांनंतर म्हणजेच 2018 मध्ये ही रक्कम वसूल करण्यात आली. तसेच, बनावट कागदपत्रे सादर करून तब्बल 95 लाखांचा इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याचे पुढे आले आहे.

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

९५ लाख करदात्याने गोळा केलेला GST जमा केल्यापासून तीन महिन्यांच्या आत सरकारी तिजोरीत जमा करणे आवश्यक आहे. अन्यथा CGST कायद्याच्या कलम 132 अंतर्गत गुन्हा आहे. CGST कायद्याच्या कलम 69 अंतर्गत 27 जानेवारी रोजी या कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे. 28 जानेवारी रोजी वाशी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कर, व्याज आणि दंड भरण्याव्यतिरिक्त, या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आहे.

नवी मुंबई आयुक्तालयाने 415 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली

हे प्रकरण CGST, मुंबई झोनने फसवणूक करणार्‍या आणि कर चुकवणार्‍यांच्या विरोधात सुरू केलेल्या अँटी-इव्हेशन मोहिमेचा एक भाग आहे. या मोहिमेमध्ये जे सरकारी तिजोरीची फसवणूक करतात. तसेच, कर चोरी करता त्यांच्याविरोधात ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून नवी मुंबई आयुक्तालयाने 415 कोटी रुपयांची करचोरी शोधून काढली आहे. यामध्ये आतापर्यंत 18.63 कोटी वसुली केली असून त्यामध्ये 10 जणांना अटक केली आहे.

625 हून अधिक करचोरी प्रकरणांची नोंद

CGST विभाग कर चुकवणार्‍यांची ओळख पटवण्यासाठी डेटा विश्लेषण साधनांचा वापर करत आहे. डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण वापरून, CGST मुंबई झोनच्या अधिकार्‍यांनी 625 हून अधिक करचोरी प्रकरणे नोंदवली आहे. 5500 कोटी वसूल केले. गेल्या पाच महिन्यांत 630 कोटी आणि 47 जणांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - विधानसभा ही सार्वभौम; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Last Updated :Jan 28, 2022, 11:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.