ETV Bharat / snippets

अमेरिका भारताला देणार सर्वात मोठी भेट, थेट अंतराळात...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 8:40 AM IST

चांद्रयान मोहिम
चांद्रयान मोहिम (Source- ETV Bharat)

मुंबई- चंद्रयानच्या यशानंतर भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिका यंदा डिसेंबरमध्ये एका भारतीय अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविणार आहे. ही माहिती भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी बुधवारी दिली. ते 248 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान बोलत होते. अमेरिकेचे राजदूत एरिक म्हणाले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२३ मध्ये अमेरिकेत आले होते. तेव्हा आम्ही त्यांना भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठविण्याचं आश्वासन दिल होतं. या मोहिमेसाठी आमचे काम सुरू आहे. भारतानं आणि अमेरिकेनं मिळून संशोधन आणि उपयुक्त तंत्रज्ञानाचा समन्वय साधला पाहिजे. त्यामुळे दोन्ही देशांना सामर्थ्याचा अधिकाधिक फायदा होऊ शकेल, "असा विश्वास अमेरिकेच्या राजदुतांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.