ETV Bharat / bharat

वैशाख पोर्णिमेला कशामुळे 'बुद्ध पौर्णिमा' म्हटले जाते? जाणून घेऊ महत्त्व - Buddha Purnima 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 8:04 AM IST

Vesak Day 2024 : जगभरात गौतम बुद्धांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात येत आहे. गौतम बुद्धांचा जीवनपरिचय आणि वैशाख पौर्णिमेचं महत्त्व जाणून घेऊ.

BUDDHA PURNIMA 2024
बुद्ध पौर्णिमा 2024 (ETV Bharat)

हैदराबाद Vesak Day 2024 : भगवान बुद्धांचा जन्म इ.स.पूर्व ६२३ मध्ये भारताला लागून असलेल्या दक्षिण नेपाळच्या तराई प्रदेशात असलेल्या लुंबिनीच्या बागेत झाला. ही तारीख वैशाख महिन्यातील पौर्णिमा होती. म्हणून दरवर्षी गौतम बुद्धांचा जन्मदिवस 'बुद्ध पौर्णिमा' म्हणून साजरा केला जातो. यावर्षी बुद्ध पौर्णिमा 23 मे म्हणजे आज आहे. हा दिवस जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. काही ठिकाणी याला बुद्ध जयंती, तर कुठं पीपल पौर्णिमा असं म्हणतात.


बौद्ध धर्मात, बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध दिवस किंवा वेसाक दिवस म्हणून साजरा केला जातो. 1999 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं बुद्ध पौर्णिमेला आंतरराष्ट्रीय 'वेशाख दिन' म्हणून घोषित केलं. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय 'वेशाख दिन म्हणून साजरा केला जातो.


संघर्षाच्या या काळात भगवान बुद्धांच्या करुणा, सहिष्णुता आणि मानवतेच्या सेवेची शिकवण सांत्वन आणि शक्तीचा स्रोत आहे. चांगल्या भविष्याच्या वाटेवर आपण सतत पुढं जात आहोत. वेसाकचा खोलवरचा समजून घेण्याची ही संधी आपण घेऊ या.- अँटोनियो गुटेरेस, महासचिव, संयुक्त राष्ट्र

वेसाक दिवस कसा साजरा करायचा? : या दिवशी विविध देशांतील लोक त्यांच्या संस्कृतीनुसार कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. भारतासह बहुतेक देशांमध्ये, बौद्ध धर्मावर विश्वास ठेवणारे लोक आपली घरं, बौद्ध विहार, बौद्ध मठ हे ठिकाण फुलं, हार आणि रंगीबेरंगी दिव्यांनी आकर्षकपणे सजवतात. मंदिरं आणि इतर आवडत्या ठिकाणी सामूहिक भंडारा आयोजित केला जातो. अनेक ठिकाणी बौद्ध धर्मातील तज्ञ भगवान बुद्धांच्या शिकवणीचा प्रचार करतात. या दिवशी सरकारी सुट्टीही असते. काही ठिकाणी लोक या निमित्तानं मिरवणुका काढतात. यानिमित्तानं अनेक लोक भगवान बुद्धांच्या शिकवणीचं जीवनात पालन करण्याचा प्रयत्न करतात.


वेसाक म्हणजे काय? : 'वैशाख' हा संस्कृत शब्द आहे. पाली भाषेत याला वेशाख म्हणतात. भगवान बुद्धांचा जन्म याच महिन्यात झाला होता. बोधगया येथील बोधीवृक्षावर कठोर तपश्चर्या केल्यावर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. वयाच्या 80 व्या वर्षी गौतम बुद्धांनी वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी उत्तर प्रदेशातील कुशीनगर (गोरखपूरपासून सुमारे 50 किमी अंतरावर) महापरिनिर्वाण प्राप्त केलं. बौद्ध धर्माचे अनुयायी बुद्ध पौर्णिमेला गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानदिन आणि महापरिनिर्वाण दिन एकत्र साजरा करतात. या दिवशी भारत, तिबेट, मंगोलियासह अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी भव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

बुद्ध हे नाव नसून एक उपाधी- भगवान बुद्धांच्या शिकवणीचा स्वीकार करून मोठ्या संख्येनं लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म भारतातून जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला. यामार्फत शांतता, करुणा आणि सद्भावनेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जातोय. बौद्ध धर्मावर विश्वास ठेवणारे लोक भगवान बुद्धांच्या शिकवणीवर विश्वास ठेवतात. जगाचे दु:ख पाहून जीवनानुभवाच्या आधारे त्यांनी हे शिक्षण दिले. जे लोक बौद्ध धर्मावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी 'बुद्ध' हे नाव नसून एक उपाधी आहे. त्याचाअर्थ एक प्रबुद्ध व्यक्ती किंवा जागृत व्यक्ती असा होतो.


गौतम बुद्धांचा संक्षिप्त परिचय

 1. गौतम बुद्धांचं बालपणातील नाव 'सिद्धार्थ' होतं.
 2. त्यांच्या आईचं नाव महामाया आणि वडिलांचं नाव राजा शुद्धोधन होतं.
 3. त्यांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सनपूर्व ६२३ मध्ये झाला.
 4. सिद्धार्थच्या आईचं निधन त्यांच्या बालपणीच झालं.
 5. यानंतर त्यांचं पालनपोषण त्यांची मावशी गौतमी यांनी केलं.
 6. या कारणास्तव, नंतर ते सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाऊ लागले.
 7. सिद्धार्थ गौतमचा विवाह यशोधरा नावाच्या राजकन्येशी झाला होता.
 8. सिद्धार्थ आणि यशोधरा यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव राहुल होतं.
 9. मुलाच्या जन्मानंतर काही वर्षांनी सिद्धार्थच्या मनात त्यागाची भावना निर्माण झाली.
 10. सत्याच्या शोधात त्यांनी सांसारिक आसक्ती सोडून शांतपणे घर सोडलं.
 11. गौतम बुद्धांबद्दल असं म्हटलं जातं की ते स्वतःचे गुरू होते.
 12. संन्यास घेतल्यानंतर त्यांना बिहारमधील बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाली.
 13. हे ठिकाण महाबोधी विहार म्हणून ओळखलं जातं.
 14. सम्राट अशोकानं या ठिकाणी भव्य विहार बांधलं होतं.
 15. हे विहार पुरीमध्ये महाबोधी या नावानं ओळखले जातं.
 16. हे ठिकाण आज बौद्ध धर्माच्या प्रमुख श्रद्धा केंद्रांपैकी एक आहे.
 17. गौतम बुद्धांनी पहिला उपदेश वाराणसीपासून १० किलोमीटर दूर सारनाथमध्ये दिला.
 18. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी महापरिनिर्वाण प्राप्त केलं.
 19. गौतम बुद्धांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म भारतातून संपूर्ण जगात पसरलाय.

हेही वाचा -

 1. बुद्ध पौर्णिमा 2024; काय आहे आजचा शुभ मुहूर्त, योग आणि राहूकाळ - Today Panchang
 2. मुंबईत जपानी बुद्ध विहार; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी देखील सबंध, जाणून घ्या इतिहास
 3. Meditation Center In Melghat : मेळघाटात ध्यान साधना; बारा वर्षात आठ हजार धम्मचाऱ्यांनी घेतलं प्रशिक्षण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.