ETV Bharat / state

आयटी रिटर्न्सच्या 263 कोटींच्या घोटाळ्यात ईडीकडून पाचव्या आरोपीला अटक, पुरावे नष्ट केल्याचे आरोप - income tax return scam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 9:12 AM IST

Enforcement Directorate सक्तवसुली संचालनालयानं (ED) २६३ कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्स रिटर्न घोटाळा प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक केली. यापूर्वी या प्रकरणात ईडीनं चार आरोपींना अटक केले होती.

ED arrests one more in Income Tax fraud case
इन्कम टॅक्स रिटर्न घोटाळा प्रकरणात आयटी अधिकारी पुरुषोत्तम चव्हाण अटक (ETV Bharat)

मुंबई Enforcement Directorate : सक्तवसुली संचालनालयानं (ED) 263 कोटी रुपयांच्या इन्कम टॅक्स रिटर्न घोटाळा प्रकरणात अटक पुरुषोत्तम चव्हाण यांना मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. त्याला न्यायालयानं 27 मेपर्यंत कोठडी सुनावली आहे.

ईडीच्या दाव्यानुसार आरोपीनं मुंबईच्या आयकर विभागात कार्यरत असताना २६३ कोटी रुपयाचा बनावट टीडीएस परतावा तयार केला. प्रोसीड ऑफ क्राइमचा (पीओसी) काही भाग ताब्यात घेण्यात आला. त्यात अधिकारी चव्हाण सहभागी होते. अटक केल्यानंतर चव्हाण याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयानं त्याला 27 मेपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. यापूर्वी या प्रकरणात अधिकारी, भूषण पाटील आणि राजेश शेट्टी या चार आरोपींना अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एक आरोपी राजेश ब्रिजलाल बत्रेजा ईडीच्या ताब्यात आहे.

ईडीची कारवाई तानाजी मंडल विरोधात : ईडीची ही कारवाई तानाजी मंडल अधिकारी आणि इतरांविरुद्ध 263.95 कोटी आयटी फसवणूक प्रकरणी भारतीय दंड संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या विविध कलमांखाली सीबीआय, दिल्लीने नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे सुरू केलेल्या तपासाचा एक भाग आहे. ईडीच्या तपासात असे दिसून आले की, आरोपी राजेश बत्रेजा आणि चव्हाण नियमितपणे संपर्कात होते. त्यांनी हवाला व्यवहार आणि गुन्ह्यातील रक्कम वळवण्याशी संबंधित गुन्ह्यात एकमेकांना मेसेज केले, असे ईडीनं न्यायालयात सांगितले.

रविवारी छापा : रविवारी चव्हाण याच्या निवासस्थानी छापा घालण्यात आला. या छाप्यामध्ये मालमत्तेची कागदपत्रे, विदेशी चलन आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आलं. ईडीने दावा केला आहे की, आरोपी चव्हाणनं पुरावे नष्ट करून तपासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुन्ह्यातील रक्कम शोधून काढता येण्यात अडचण निर्माण झाली. मनी लाँड्रिंग विरोधी ईडीने याआधीच महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आरोपी व्यक्तींच्या 168 कोटी रुपयांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य आरोपी अधिकारी आणि इतर 10 विरुद्ध फिर्यादी तक्रारदेखील दाखल करण्यात होती.

हेही वाचा

  1. झारखंडचे मंत्री आलमगीर आलमचे ओएसडीसह नोकराला रांचीमध्ये अटक, ईडीचा छापा संपला - ED action in ranchi
  2. ललित टेकचंदानीला ईडीचा दणका, ११३.५ कोटींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश - Lalit Tekchandani
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.