ETV Bharat / politics

ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड? लंकेनी गैरसमजातून आरोप केल्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण - Nilesh Lanke On EVM Machines

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 8:22 PM IST

Nilesh Lanke On EVM Machines : अहमदनगरमध्ये ईव्हीएम (EVM Machine) ठेवलेल्या गोदामाच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड केल्याचा व्हिडिओ निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी ट्विट केलाय. तर लंके यांनी गैरसमजातून आरोप केल्याचं जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Evm Machine Problem
ईव्हीएम मशीन (Ahmednagar Reporter)

प्रतिक्रिया देताना जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ (Ahmednagar Reporter)

अहमदनगर Nilesh Lanke On EVM Machines : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना एक बेकायदेशीर व्यक्ती निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा दावा केलाय. या प्रकरणी निलेश लंके यांनी एक व्हिडिओ ट्विट करत ही माहिती दिली असून प्रशासनावर याचं खापर फोडलंय.

अपुऱ्या माहितीवर आरोप : निलेश लंके यांनी अपुऱ्या माहितीवर आरोप केले आहेत. ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाला तिहेरी सुरक्षा लावण्यात आलीय. ज्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवले आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. सीसीटीव्हीची एक वायर लूज झाली होती. हे लक्षात आल्यानंतर येथील कर्मचारी यांनी रितसर नोंद करून आतामध्ये जावून वायर रिपेर करून पुन्हा बाहेर आला असल्याची माहिती, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी दिलीय.



ट्विटमध्ये निलेश लंकेनी काय सांगितलं : बुधवारी रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमानं प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्हीमध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात. मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातंय. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहातय.


काय आहे प्रकरण : महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे सहकारी राहुल झावरे यांनी त्यांच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर सांगितलं की, 21 मेच्या रात्री 8 वाजून 22 मिनिटांनी अचानक एक व्यक्ती गोदामाचा शटर ठिकाणी आला. पोलीस सीआरपी सुरक्षा यंत्रणेला कोणतीही कल्पना न देता या ठिकाणी व्यक्ती आलाच कसा? त्याचवेळेस तिथे उपस्थित असणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठान कार्यकर्त्यांना ही घटना समजली. त्यांनी ताबडतोब हा व्यक्ती कोण आहे? अशी पोलिसांना विचारणा केली. त्यावेळेस त्यांनासुद्धा ह्या व्यक्तीबद्दल काहीही माहिती नव्हती. त्या अज्ञात व्यक्तीनं सांगितलं की, मला फक्त कलेक्टर साहेब विचारतील तुझं काय काम आहे. बाकी कोणाचा काही संबंध नाही, मी टेक्निकलचा माणूस आहे. बेकायदेशीर रित्या हा माणूस तिथपर्यंत पोहोचला कसा? गोदामाच्या शटरजवळ गेला कसा? सुरक्षा यंत्रणा असताना गोदामाच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही यंत्रणा मधील छेडछाड करत असताना निलेश लंके यांच्या कार्यकर्ते यांनी तो डाव हाणून पाडला. केंद्र राज्य स्थानिक पोलीस ही तेहरी सुरक्षा असताना हा व्यक्ती आत आला कसा? याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी लंके यांनी केली होती.

हेही वाचा -

  1. पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना २४ मे पर्यंत पोलीस कोठडी - pune porsche accident update
  2. पुण्यातील पब संस्कृती कायमची संपवा; रवींद्र धंगेकर यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडं मागणी - Pune Hit And Run Case
  3. अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचे आहे अंडरवर्ल्ड कनेक्शन, पोलिसांनी वरदहस्त दाखविल्यानं टळली अटक - pune hit and run accident
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.