महाराष्ट्र

maharashtra

Anganwadi Worker : पोलिसांनी रोखला अंगनवाडी सेविकांचा मोर्चा, पोलिसांसोबतच केली भावबीज साजरी

By

Published : Oct 26, 2022, 6:34 PM IST

विविध मागण्यांसाठी कामगार मंत्र्यांच्या घरावर काढण्यात येणारा मोर्चा ( March at Labor Minister's house ) रोखल्याने अंगणवाडी महिला सेविकांनी ( Anganwadi women worker ) पोलिसांना भाऊबीजेच्या निमित्ताने ओवळणी करत आंदोलन केले आहे. कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे ( Guardian Minister of Sangli Suresh Khade ) यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार होता,मात्र पोलिसांनी तो रोखून धरला, त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पोलीस अधिकाऱ्यांना ओवाळणी करत भाऊबीज साजरी केली.

Anganwadi workers
Anganwadi workers

सांगली -विविध मागण्यांसाठी कामगार मंत्र्यांच्या घरावर काढण्यात येणारा मोर्चा ( March at Labor Minister's house ) रोखल्याने अंगणवाडी महिला सेविकांनी ( Anganwadi women worker ) पोलिसांना भाऊबीजेच्या निमित्ताने ओवळणी करत आंदोलन केले आहे. कामगार तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे ( Guardian Minister of Sangli Suresh Khade ) यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार होता,मात्र पोलिसांनी तो रोखून धरला, त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पोलीस अधिकाऱ्यांना ओवाळणी करत भाऊबीज साजरी केली.

पोलिसांनी रोखला आंगनवाडी सेविकांचा मोर्चा

पोलिसांनी मज्जावा -अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर महिलांचा असणारे तूटपुंज मानधन वाढवण्यात यावं,यासह विविध मागणीसाठी लालबावटा आशा वर्कर व गटप्रवर्तक महिला युनियनच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सांगली शहरातील घरावर भाऊबीजेच्या निमित्ताने ओवाळणीसाठी मोर्चा काढण्याचा येणार होता.विश्रामबाग चौक येथील क्रांतिसिंह नाना पाटील येथून हा मोर्चा मंत्री सुरेश खाडे बंगल्यावर काढण्यात येणार होता,मात्र पोलिसांनी मज्जावा करत सर्व महिलांना उद्यानातच रोखून धरले

महिला आंदोलक पोलिसांच्या मध्येशाब्दिक वाद - मंत्री सुरेश खाडे हे जिल्ह्याबाहेर असल्याने हा मोर्चा काढू नये,असा पवित्र पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे महिला आंदोलने पोलिसांच्या मध्येशाब्दिक वाद रंगला होता यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती,अखेर एक तासांच्या कालावधीनंतर सहाय्याक कामगार आयुक्त आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी आंदोलकांची समजूत काढली,त्यामुळे कामगार मंत्र्यांच्या घरावर भाऊबीज ओवाळण्यासाठी काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला,मात्र अंगणवाडी सेविकांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना भाऊबीजेच्या निमित्ताने ओवाळणी करत आपले आंदोलन पूर्ण केलं.तसेच यावेळी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details