ETV Bharat / state

शेअर्स अफरातफर प्रकरणात युसुफ लकडावालाच्या सावत्र मुलावर गुन्हा दाखल - Economic Offence wing

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 1:17 PM IST

Economic Offence wing : युसुफ लकडावाला तुरुंगात असताना त्याचा सावत्र मुलगा फिरोज लकडावालानं शेअर्ससंबंधी अफरातफर केल्याच आरोप करत युसुफच्या पत्नीनं आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती. यासंबंधीच्या चौकशी दरम्यान, फिरोजनं गुन्हेगारी कट रचल्याच स्पष्ट झालं असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

yusuf-lakdawala
युसूफ लाकडावालाला (ETV BHARAT)

मुंबई Economic Offence wing : युसुफ लकडावाला तुरुंगात असताना त्याचा सावत्र मुलगा फिरोज लकडावाला यानं शेअर्ससंबंधी अफरातफर केल्याचा आरोप करत युसुफच्या पत्नीनं आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल केला होता. त्या तक्रारीवरून बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हे शाखेनं फिरोज, त्याची पत्नी नूरी आणि इतरांच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम ४०६, ४२० , ३४ आणि १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलिस निशिथ मिश्र यांनी दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बिल्डर आणि फायनान्सर युसुफला अटक केली होती. दरम्यान, सप्टेंबर २०२१ मध्ये आर्थररोड कारागृहात लाकडावाला याचा मृत्यू झाला होता.

चौकशीत उघड झाले आरोप: आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीत आरोपी फिरोज लकडावाला, त्याची पत्नी नूरी लकडावाला आणि इतरांनी 10 प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांमधील शेअर्सचे हक्क जारी करून गुन्हेगारी कट रचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या १० कंपन्यांमध्ये तक्रारदार सबिनाचे मृत पती बहुसंख्य शेअरहोल्डर होते. त्यांना या शेअर्सचे सदस्यत्व घेण्याचा अधिकार वापरण्याचा पर्याय न देता, बोर्ड मीटिंग न घेता, भागीदारीसाठी कोणतीही नोटीस जारी न करता किंवा कोणतेही नवीन खाते न उघडता आणि महत्त्वाचं म्हणजे असे हक्क जारी करण्यात आले की, ज्यात फेस व्हॅल्यू ही नेट असेट्स व्हॅल्यू पेक्षा 100 पटीने कमी होती. अशा प्रकारे आरोपीने मृत वडीलांचे शेअरहोल्डिंग आणि तक्रारदार सबिना यांचे शेअर होल्डिंग कमी केलं आणि तिचे ४५ कोटींपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान केले, म्हणून तक्रारदार सबिना लकडावाला यांनी आर्थिक गुन्हे शाखेला तक्रार दिली होती. प्राथमिक चौकशीनंतर बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई येथील मालमत्ता जप्त: मुंबईतील बिल्डर आणि दिवंगत फायनान्सर युसूफ लकडावालाची वांद्रे येथील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जानेवारी २०२३ मध्ये वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं दिले होते. वांद्रे पोलिस ठाण्याला हे आदेश देण्यात आले होते. युसूफ लकडावाला पहिल्या पत्नीपासून जन्मलेला सावत्र मुलगा फिरोज आणि फिरोजची पत्नी नूरी यांचे २.७५ लाख रुपये देऊ शकला नाही. युसुफला ही रक्कम दुसरी पत्नी सबिना हिला द्यायची होती. युसूफ लकडावाला याला 2021 मध्ये फसवणूक, जमीन हडप आणि फसवणूक प्रकरणी ईडीने अटक केली होती. युसुफने इतर काही लोकांसह हैदराबादच्या नवाबाचा चार एकरचा भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला होता.


युसूफच्या दुसऱ्या पत्नींने घेतली कोर्टात धाव : लकडावालाच्या दुसऱ्या पत्नीनं वांद्रे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली होती आणि मुलगा आणि सून यांच्याकडे पोटगीची मागणी केली होती. मात्र त्याच्या मुलानं व सुनेनं याला नकार दिला. मात्र न्यायालयीन कारवाईनंतर २०२२ मध्ये न्यायालयाने दिवंगत लकडावाला यांचा मुलगा फिरोज आणि त्यांची सून नूरी यांना सबीनाला पोटगी म्हणून २.७५ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यांनी ते दिले नाही. महाराष्ट्रातील खंडाळा येथे ५० लाख रुपयांच्या कथित जमीन बळकावल्याप्रकरणी मे २०२१ मध्ये युसूफ लकडावाला अटक करण्यात आली होती.

हेही वाचा

  1. बांधकाम व्यावसायिक युसूफ लकडावालाचा मृत्यू; 'या' प्रकरणात मुबंई पोलिसांनी केली होती अटक
  2. आयटी रिटर्न्सच्या 263 कोटींच्या घोटाळ्यात ईडीकडून पाचव्या आरोपीला अटक, पुरावे नष्ट केल्याचे आरोप - income tax return scam
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.