रांची- झारखंड भाजपाचे सरचिटणीस आदित्य साहू यांनी खासदार जयंत सिन्हा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसला सिन्हा यांनी उत्तर दिलं. त्यांनी उत्तरात म्हटलं की, कोणत्याही पक्षाचे कार्यक्रम, बैठकांसाठी पक्षाकडून निमंत्रण देण्यात आलेलं नाही. वैयक्तिक कामामुळे विदेशात असल्यानं पोस्टल बॅलेट प्रक्रियेद्वारे मतदान केलं आहे. निवडणुकीच्या कामात सहभागी व्हावे, अशी इच्छा असती तर तुम्ही माझ्याशी संपर्क केला असता," असा टोलादेखील सिन्हा यांनी साहू यांना लगावला. आदित्य साहू यांनी नोटीस देत सिन्हा यांच्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी पत्रात म्हटले, मनीष जैस्वाल यांना हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर तुम्ही निवडणूक प्रचारात भाग घेतला नाही. मतदानदेखील केलं नाही.
भाजपाच्या कारणे दाखवा नोटीसला खासदार जयंत सिन्हांचं उत्तर; म्हणाले, "प्रचाराकरिता पक्षाकडून..."
Published : May 23, 2024, 12:39 PM IST