ETV Bharat / entertainment

शाहरुख खानच्या तब्येतीचं अपडेट, 'किंग खान'च्या मॅनेजरचा मेसेज - Shah Rukh Khan health update

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 5:13 PM IST

Shah Rukh Khan health update : 21 मे रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर केकेआर विरुद्ध एचआरएच यांच्यातील सामना पाहिल्यानंतर शाहरुख खान आजारी पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. आता त्यांची मॅनेजर पूजा ददलानी यांनी त्याची हेल्थ अपडेट शेअर केले आहे.

Shah Rukh Khan
शाहरुख खान ((Photo: ANI))

मुंबई - Shah Rukh Khan health update शाहरुख खान मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात झालेला प्लेऑफ सामना पाहण्यासाठी मैदानावर हजर होता. यावेळी तब्येतीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्याला तातडीनं केडी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. उष्णतेच्या लाटेमुळे त्याला डीहायड्रेशनचा त्रास झाला. त्याला रुग्णालयात दाखल केल्याच्या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं. आता त्याची मॅनेजर पूजा ददलानी हिनं शाहरुख खानच्या हेल्थ अपडेट दिले आहेत.

मॅनेजरनं दिली शाहरुख खानची हेल्थ अपडेट

21 मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्याच्यावेळी पूजा दादलानी शाहरुख खानबरोबरच नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे हजर होती. आज 23 मे रोजी शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी हिनं तिच्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर शाहरुखच्या तब्येतीचे हेल्थ अपडेट दिले आहे. याबरोबरच तिनं शाहरुख खानच्या चाहत्यांचे त्याच्याबद्दल काळजी केल्याबद्दल आभार मानले आहेत. पूजाने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'श्रीयुत शाहरुख खान यांच्या सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांच्याबद्दल काळजी केल्याबद्दल आभार. आता त्यांची प्रकृती ठीक आहे आणि ते बरे होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमधील अनेक भागात उष्णतेची लाट पाहायला मिळाली होती. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अहवालानुसार, अहमदाबाद शहर मंगळवार आणि बुधवारी "उष्णतेच्या लाटेत" होते. तेथे अनुक्रमे 45.2 आणि 45.9 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेलं. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, कोलकाता नाईट रायडर्सने मंगळवारी येथे क्वालिफायर 1 मध्ये सनरायझर्स हैदराबादवर आठ गडी राखून विजय मिळवून चौथ्या आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला.

शाहरुख खानच्या अधिकृत X अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये शाहरुख त्याच्या संघाचा विजय साजरा करताना, त्याची मुले सुहाना खान आणि अबराम खान त्याच्याबरोबर होते. खान यांनी स्टेडियममध्ये चाहत्यांना आणि खेळाडूंना शुभेच्छाही दिल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स रविवारी चेन्नईत फायनल खेळणार आहे.

हेही वाचा -

  1. शाहरुख खानला लागला उन्हाचा चटका, अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल - SHAH RUKH KHANS HEALTH DETERIORATED
  2. बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन जूनमध्ये सुरू, घोषणेचा प्रोमो व्हायरल - BIGG BOSS OTT 3
  3. 'सावी'चं कथानक पौराणिक कथेशी जोडलेलं असल्याचा अभिनय देवनं केला खुलासा - Abhinay Dev
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.