ETV Bharat / entertainment

'सावी'चं कथानक पौराणिक कथेशी जोडलेलं असल्याचा अभिनय देवनं केला खुलासा - Abhinay Dev

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 2:46 PM IST

Savi linked to a mythological story : सावी हा चित्रपट 31 मे 2024 रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे. अलिकडेच याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचं कथानक पुराणकथेतील सावित्रीच्या कथेशी जुळत असल्याचं दिग्दर्शक अभिनय देव यानं म्हटलंय.

Abhinay Dev
अभिनय देव (Savi poster and Abhinay Dev (ANI))

मुंबई - Savi linked to a mythological story : दिग्दर्शक अभिनय देव आगामी चित्रपट 'सावी' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अनिल कपूर, दिव्या खोसला आणि हर्षवर्धन राणे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

एएनआयला दिलेल्या एका खास मुलाखतीत अभिनय म्हणाला की 'सावी' चित्रपटाची स्क्रिप्ट जेव्हा मी वाचली तेव्हा लक्षात आलं की याची कथा आपल्या पुराणातल्या सावित्रीच्या कथेशी जोडली गेलेली आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर यमराजाशी लढून पतीचा आत्मा परत मिळवणारी सावित्री होती. तशीच या चित्रपटात पतीनं न केलेल्या गुन्ह्यासाठी तुरुंगात टाकल्यानंतर त्याची सुटका व्हावी म्हणून लढणारी सावी आहे.

अभिनय पुढे म्हणाला, "प्रत्येक स्त्री पुरुषांपेक्षा खूप शक्तिशाली असते. त्यांच्या आतमध्ये अशी एक शक्ती असते जी त्या योग्य वेळी वापरतात. मग ती घरातील स्त्री असो की व्यवसाय करणारी. सावी ही एका साध्या मुलीची कथा आहे जिला एक चांगलं कुटुंब, चांगलं घर यासारख्या आकांक्षा आहेत. पण त्याच वेळी तिच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि ती पतीला न्याय मिळण्यासाठी जीवाचं रान करते"

अभिनयनं 'होममेकर' आणि 'हाऊसवाइफ' या शब्दांबद्दलही आपलं मत मांडले. 'गृहिणी' पेक्षा 'होममेकर' हा शब्द अधिक चांगला आहे असं त्याला वाटतं. लोक गृहिणीबद्दल गोंधळलेले असतात. हाऊसवाईफ म्हणजे घरात राहणारी स्त्री किंवा पतीला पाठिंबा देण्यासाठी घरी काम करणारी स्त्री असा विचार लोक करतात. पण ती होममेकर असते, असं अभिनयनं म्हटलंय.

अनिल कपूर साकारत असलेल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अभिनय म्हणाला, "अनिल सर या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट आहेत कारण ते साकारत असलेलं पात्र खूप शक्तिशाली आणि मनोरंजक आहे." दिव्या खोसला त्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अभिनय म्हणाला, "दिव्या एक साधी मुलगी असल्यानं ती 'सावी' म्हणून प्रेक्षकांना सहज पटणारी आहे."

'सावी'च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला होता. या चित्रपटात अनिल कपूर, दिव्या खोसला आणि हर्षवर्धन राणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये दिव्याच्या चेहऱ्यावर निष्पाप हास्य आणि हातात बंदूक आहे अशा व्यक्तिरेखेच्या दोन बाजू दिसत आहेत. चित्रपटाचे शीर्षक सुरुवातीला 'सावी: अ ब्लडी हाउसवाइफ' असं ठरलं होतं.

हेही वाचा -

  1. गाण्याच्या अनधिकृत वापराबद्दल इलैयाराजांनी 'मंजुम्मल बॉईज'च्या निर्मात्यांना दिली कॉपीराइट नोटीस - Manjummel Boys
  2. 'द अकादमी'नं 'कलंक'मधील आलिया भट्टचा डान्स व्हिडिओ केला शेअर - THE ACADEMY GHAR MORE PARDESIYA
  3. शाहरुख खानला लागला उन्हाचा चटका, अहमदाबादच्या रुग्णालयात दाखल - SHAH RUKH KHANS HEALTH DETERIORATED
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.