महाराष्ट्र

maharashtra

कोकणातील अवकाळी पावसाचा आंबा आणि काजू पिकावर प्रादुर्भाव; शेतकरी हवालदिल

By

Published : Nov 20, 2021, 12:56 PM IST

तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या मोहरावर झालेला आहे आंब्यावर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना पहावयास मिळतोय, तसेच आलेला मोहर काळा पडत आहे, यामुळे कोकणातील आंबा पीक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

आंबा आणि काजू पिकावर प्रादुर्भाव
आंबा आणि काजू पिकावर प्रादुर्भाव

रत्नागिरी -गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम कोकणातील आंबा आणि काजू पिकावर झाला आहे. दिवाळीच्या दरम्यान कोकणात थंडीची चाहूल पाहायला मिळाली होती. त्याचा परिणाम म्हणून कोकणातील आंबा बागेत मोहर देखील आला होता. त्याचवेळी इथल्या शेतकऱ्यांनी आंबा पिकावर फवारणी देखील केल्या होत्या. मात्र आता हे सगळं वाया गेलं आहे.

कोकणातील अवकाळी पावसाचा आंबा आणि काजू पिकावर प्रादुर्भाव

अवकाळीचा आंब्याच्या मोहरावर परिणाम

कारण तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने त्याचा परिणाम आंब्याच्या मोहरावर झालेला आहे आंब्यावर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना पहावयास मिळतोय, तसेच आलेला मोहर काळा पडत आहे, यामुळे कोकणातील आंबा पीक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details