ETV Bharat / state

पुणे हिट अँड रन प्रकरण : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार, ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक, पोलीस कोठडीत रवानगी - Pune Hit And Run Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 9:14 AM IST

Updated : May 27, 2024, 5:56 PM IST

Pune Car Accident Case Updates : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात अल्पवयीन मुलानं पोर्शे कारनं दोघांना चिरडलं होतं. या मुलाला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Pune Porsche Car Accident Sassoon Hospital doctors changes minor boy blood samples crime branch arrested both
पुणे हिट अँड रन प्रकरण (Source ETV Bharat)

पुणे Pune Car Accident Case Updates : पुणे कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारनं दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच कामाला लागल्याचं हळू-हळू उघड होत चाललंय. याच प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली. आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाच्या डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली.

30 मेपर्यंत पोलीस कोठडी : पुणे हिट अँड रन प्रकरणात अटक असलेले ससून हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीहरी हाळनोर, डॉक्टर अजय तावरे, अतुल घटकांबळे यांना 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अपघातादरम्यान अल्पवयीन मुलानं मद्यप्राशन केलं होतं की नाही, हे तपासण्यासाठी नऊ तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. परंतु, या चाचणीत मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची फेरफार केल्याचा प्रकार समोर आला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं याप्रकरणी दोन्ही डॉक्टरांना ताब्यात घेतलंय. सध्या पुणे पोलीस आयुक्तलयात डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांची कसून चौकशी सुरू आहे. या दोघांना दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं. दरम्यान, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज (27 मे) पत्रकार परिषदेत कारवाईची सविस्तर माहिती दिली.

...त्यामुळं केली दुसऱ्यांदा ब्लड टेस्ट : अपघात झाल्यानंतर येरवाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या रक्तात मद्याचा किती अंश आहे, हे तपासण्यासाठी तातडीनं त्याची ब्लड टेस्ट करणं गरजेचं होतं. परंतु, अपघात झाल्यानंतर तब्बल नऊ तासांनी मुलाला ससून रुग्णालयात ब्लड टेस्ट करण्यासाठी नेण्यात आलं. त्यानंतर याप्रकरणात धनिकपुत्राला मदत झाल्याच्या संशयानं पोलिसांनी पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीच्या रक्ताची चाचणी केली. तसंच हे दोन्ही नमुने फॉरेन्सनिक लॅबकडं पाठवण्यात आले. दोन्ही रुग्णालयातील ब्लड सॅम्पल्स एकाच व्यक्तीचे आहेत की नाही, याचीही तपासणी करावी, असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा -

  1. 'मी' मध्यमवर्गीय असल्यानं माझ्यावर पोर्श कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, आर्यन नीखराचा आरोप - Pune hit and run case
  2. आरोग्य प्रमुखाचे मुख्यमंत्र्यांवर लेटर बॉम्ब, मंत्री महोदयांच्या दबावामुळे माझे निलंबन झाल्याचा सनसनाटी आरोप - Dr Bhagwan Pawar Allegation
  3. पुणे हिट अँड रन प्रकरणी 'त्या' अपघातस्थळी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा - Essay Competition On Pune Accident
Last Updated : May 27, 2024, 5:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.