ETV Bharat / state

'मी' मध्यमवर्गीय असल्यानं माझ्यावर पोर्श कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, आर्यन नीखराचा आरोप - Pune hit and run case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 26, 2024, 8:49 PM IST

Pune hit and run case : 'मी' मध्यमवर्गीय असल्याने पोर्श कार अपघातप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप आर्यन देव नीखरानं केला आहे. त्यानं अपघातानंरत एक रॅप गाणं तयार करून सोशल मीडियावर टाकलं होतं.

Pune hit and run case
पोर्श कार अपघात प्रकरण (ETV Bharat MH)

आर्यन देव नीखरा (Pune hit and run case)

पुणे Pune hit and run case : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 19 मे रोजी भरधाव पोर्श कारनं दुचाकीला धडक दिल्यानं दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा त्यावेळी ही कार चालवत होता. त्याच रात्री ताब्यात घेतल्यानंतर अवघ्या 15 तासांत या मुलाची जामिनावर सुटका करण्यात झाली होती. त्यामुळं या घटनेबाबत राज्यासह देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक रॅप गाणं व्हायरल झालंय. या गाण्यातील मुलगा अल्पवयीन आरोपी असून त्याच्या कृत्याचं समर्थन करत गाणं गाताना दिसत आहे. त्यामुळं या घटनेबाबत अधिकच संताप व्यक्त होत होता. आता हे रॅप गाणं गाणाऱ्या तरुणाविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

काय प्रकरण आहे? : पोर्श कारच्या अपघातानंतर हे रॅप गाणं व्हायरल झालं. हे गाणे गाणारा मुलगा एक अल्पवयीन आरोपी असून तो पोर्श कारच्या अपघाताचं समर्थन करतो. या गाण्यामुळं लोकांमध्ये आणखीच संताप निर्माण झाला. अखेर अल्पवयीन आरोपीच्या आईला हा आपला मुलगा नसल्याचं सांगावं लागलं. गुरुवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली असता त्यांनीही हा खोटा व्हिडिओ असल्याचं नमूद केलं असून अल्पवयीन आरोपीच्या नावानं व्हिडिओ बनवणाऱ्या मुलाचा शोध सुरू होता. त्यावर आता व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणानं एक व्हिडिओ शेअर करत 'मी' मध्यमवर्गीय असल्यानं पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केलाय.

याबाबत व्हिडिओ बनवणारा आर्यन नीखरा म्हणाला की, 'मी फक्त कंटेंट क्रियेटर आहे. पुणे पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांनी गुन्हा मागे घ्यावा. मूळ केस पासून सगळ्यांचं लक्ष वळवण्यासाठी माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मी कोणाला शिवीगाळ केली नाही. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या', असं यावेळी आर्यननं सांगितलं.

आर्यन देव नीखराविरोधात गुन्हा दाखल : कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी काल आर्यन देव नीखराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आर्यनवर आता माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67, भारतीय दंड संहितेच्या कलम 509, 294B अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आर्यन नीखरा यानं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोर्शे अपघातातील आरोपी, पीडितांची खिल्ली उडवणारा व्हिडिओ तयार करून अपलोड केला होता.

कोण आहे आर्यन देव निखरा? : आर्यनच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो दिल्लीतील ग्रॅव्हिटी मीडियामध्ये व्हिडिओ निर्माता आणि मिम्स मेकर म्हणून काम करतो. आर्यन देव नीखरा हा मूळचा मध्य प्रदेशचा असून त्याचं शालेय शिक्षण शिवपुरीच्या हॅप्पी दास शाळेत झालं आहे. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ग्वाल्हेरच्या एमिटी विद्यापीठात त्यानं त्याचं पुढील शिक्षण घेतलं आहे.

हे वाचलंत का :

  1. पुणे हिट अँड रन प्रकरणी 'त्या' अपघातस्थळी युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा - Essay Competition On Pune Accident
  2. पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अ‍ॅक्शन मोडवर; शहरातील 49 पब आणि बारवर कारवाई - Action Against Pubs And Bar In Pune
  3. पुणे हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन मुलाच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल - Pune Hit And Run Case
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.