महाराष्ट्र

maharashtra

IPL 2022 Final : आयपीएलचा फायनल सामना रात्री 8 वाजता सुरु होणार, जाणून घ्या आहे कारण

By

Published : May 19, 2022, 10:03 PM IST

बीसीसीआयने अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलच्या समारोपासाठी एक रंगारंग कार्यक्रम आखला आहे, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. त्यामुळे अंतिम सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

IPL 2022
IPL 2022

हैदराबाद:आयपीएल 2022 ( IPL 2022 ) हंगामातील सर्व संध्याकाळचे सामने 7.30 वाजल्यापासून खेळवले जात आहेत. मात्र आयपीएल फायनलसाठी बदल पाहायला मिळेल. वास्तविक, हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार नसून रात्री 8 वाजता सुरू होईल. या स्पर्धेतील विजेतेपदाचा ( Final Match ) सामना रविवारी (२९ मे) अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium ) होणार आहे.

क्रिकबझ, बीसीसीआय आणि आयपीएल अधिकार्‍यांच्या मते, समारोप समारंभाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहतील. हा कार्यक्रम संध्याकाळी 6.30 वाजल्यापासून सुरू होईल आणि 50 मिनिटे चालेल. अशा परिस्थितीत आयपीएलच्या अंतिम सामन्याची नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल आणि सामना 30 मिनिटांनी म्हणजेच रात्री 8 वाजता सुरू होईल. याआधी पुढील हंगामातील सामने रात्री 8 वाजल्यापासून होणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच यापूर्वी 2008 ते 2017 या कालावधीत लीगचे हे वेळापत्रक होते.

2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफ जवान शहीद झाल्याबद्दल आयपीएलचा समारोप सोहळा टाळण्यात आला होता. त्याचवेळी 2020 साली कोरोनाने दस्तक दिली आणि पुढच्या वर्षीही भीतीच्या सावटाखाली ही स्पर्धा भारताबाहेर पार पाडण्यात आली. अशा परिस्थितीत 2018 नंतर पहिल्यांदाच चाहत्यांना 2022 मध्ये मनोरंजनाचे कॉकटेल मिळणार आहे. या अगोदर आयपीएलच्या उद्घाटन आणि समारोप समारंभात बॉलिवूड स्टार्स चमकायचे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या (CoA) राजवटीत ते तीन वर्षांसाठी बंद होते. यावर्षी 26 मार्च रोजी उद्घाटन सोहळा झाला नाही.

यावर्षी देखील 26 मार्चला पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा नव्हता. समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय नंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. आयपीएलचा 15वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (22 मे) साखळी फेरीतील 70 सामने पूर्ण होतील. यानंतर अहमदाबाद आणि कोलकाता येथे प्लेऑफचे आयोजन करण्यात येणार आहे. क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामना 24 आणि 25 मे रोजी कोलकातामध्ये खेळवला जाईल. त्यानंतर अहमदाबाद मध्ये 27 आणि 29 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर-2 आणि फायनलचा सामना होईल.

हेही वाचा -IPL 2022 GT vs LSG : नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, 'अशी' आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

ABOUT THE AUTHOR

...view details