ETV Bharat / sports

आरसीबीच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती, जाणून घ्या त्याची कारकीर्द - Dinesh Karthik Retirement

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 11:44 AM IST

आयपीएल 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा राजस्थानकडून सपाटून पराभव झाला. त्यानंतर दिनेश कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. जाणून घेऊ दिनेश कार्तिकची क्रिकेटविश्वाातील कारकीर्द

Dinesh Karthik retires from IPL
Dinesh Karthik retires from IPL (SOURCE - IANS)

हैदराबाद Dinesh Karthik Retirement: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ चा एलिमिनेटर सामना २००८ च्या चॅम्पियन राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला गेला. मात्र, या सामन्यानंतर राजस्थानच्या विजयापेक्षा दिनेश कार्तिकच्या निवृत्तीची जास्त चर्चा होते. आरसीबीच्या पराभवानंतर बंगळुरूचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकनं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे.

दिनेश कार्तिकची निवृत्तीची घोषणा: भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची आयपीएल कारकीर्द संपुष्टात आली आहे. कार्तिकनं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या आयपीएल एलिमिनेटर सामन्यात आरसीबीसाठी मैदानात उतरला होता. या सीझनला सुरुवात होण्यापूर्वीच दिनेश कार्तिकने हा त्याचा शेवटचा आयपीएल सीझन असेल, असे जाहीर केले होते. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीकडून झालेल्या पराभवानंतर ड्रेसिंग रुममध्ये परतत असताना त्यानं सर्वांचे आभार मानले.

एमएस धोनीच्या आधी पदार्पण: एमएस धोनीच्या आधी दिनेश कार्तिकनं क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्समधून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. कार्तिक १६ वर्षात ६ संघांसाठी खेळला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावांचा समावेश आहे.

दिनेश कार्तिकचे विक्रम: दिनेश कार्तिकने या काळात अनेक विक्रम आपल्या नावावर केले. कार्तिकच्या नावावर २५० हून अधिक सामने खेळण्याचा विक्रम आहे. या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने १६ वर्षात २५७ सामने खेळले. या यादीत एमएस धोनी २६४ सामन्यांसह पहिल्या स्थानावर आहे. यासोबतच विकेटकीपिंगमध्ये १०० हून अधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दिनेश कार्तिकचा समावेश आहे.

  • आयपीएल कारकिर्दीत ४५०० हून अधिक धावा: दिनेश कार्तिक हा एक असा फलंदाज आहे ज्याने यष्टिरक्षक म्हणून ४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. कार्तिकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ४८४२ धावा केल्या. कार्तिकने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत २२ अर्धशतकेही झळकावली आहेत.

यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी: या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. त्याने १५ सामन्यात ३६.२२ च्या सरासरीने आणि १८७.३६ च्या स्ट्राईक रेटने ३२६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश होता. कार्तिकने या मोसमात २७ चौकार आणि २२ षटकार मारले. आयपीएलच्या डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिनेश कार्तिकचा समावेश आहे.

आरसीबी आयपीएलमधून पडली बाहेर- सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम चेंडूनं आणि नंतर बॅटनं चमकदार कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ विकेट्सने पराभव केला. या विजयासह राजस्थान रॉयल्स दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पोहोचला आहे. जिथे त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी (SRH) होईल. तर आयपीएल २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रवास संपला आहे.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.