ETV Bharat / sports

राजस्थानचा बंगळुरूवर 4 गडी राखून 'रॉयल' विजय, विराटचे विजेतेपदाचे स्वप्न उद्धवस्त! - RR vs RCB IPL 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 6:52 PM IST

Updated : May 23, 2024, 7:00 AM IST

RR vs RCB IPL 2024 राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं बंगळुरूचा ४ गडी राखून पराभव केला.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

अहमदाबाद - नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थाननं (RR) 4 गडी राखून बंगळुरूवर (RCB) विजय मिळविला. बंगळुरूनं दिलेल्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं विजय मिळवून बंगळुरूला आयपीएल स्पर्धेतून बाहेर काढले.

संपूर्ण सामन्यात राजस्थानच्या खेळाडुंनी चांगली कामगिरी करत आरसीबीच्या खेळाडूंवर चांगलाच दबाव निर्माण केला. आरसीबीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सनं 19 षटकांत 6 गडी गमावून 174 धावा करत सहजरित्या सामना जिंकला. या पराभवामुळे आरसीबीला आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून देण्याचे विराट कोहलीचे स्वप्न झाले. पराभव झाल्यानं आरसीबी संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला. ऑफस्पिनर रविचंद्रन ४ षटकात केवळ १९ धावा देत २ बळी घेतले. राजस्थानला विजय मिळवून देत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या अश्विनला प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. राजस्थान रॉयल्सचा आता चेन्नई येथील सामन्यात क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी सामना होणार आहे. तर चेन्नईतील क्वालिफायर 2 सामन्यातील विजेत्याचा सामना रविवारी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

RR vs RCB IPL 2024 : आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 विकेट गमावून 172 धावा केल्या. या सामन्यात आरसीबीकडून रजत पाटीदारने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 34 धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय विराट कोहलीने 33 आणि महिपाल लोमरने 32 धावांचं योगदान दिलं. या फलंदाजांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि कॅमेरून ग्रीन 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तर दिनेश कार्तिकने केवळ 11 धावा केल्या. या सामन्यात आवेश खानने 3, रविचंद्रन अश्विनने 2, संदीप सिंग, ट्रेंट बोल्ट आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 1 बळी घेतला.

सुरुवातीला एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह त्याने फाफ डू प्लेसिसच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. या सामन्यासाठी, दोन्ही संघांनी मागील सामन्यातील प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केला नाही. आयपीएल 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात संजू सॅमसन राजस्थानचे कर्णधारपद भूषवणार असून फाफ डू प्लेसिस आरसीबीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. पराभूत संघाचे आयपीएल 2024 चे चॅम्पियन होण्याचे स्वप्न या सामन्यात भंगणार आहे, तर विजयी संघ क्वालिफायर 2 मध्ये सनराजर्स हैदराबादशी सामना करताना दिसणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. राजस्थान आणि बेंगळुरू यांच्यातील हा सामना खूपच रंजक असणार आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी - आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि टॉम कोहलर कॅडमोर यांनी राजस्थान रॉयल्ससाठी डावाची सुरुवात केली. आरसीबीसाठी स्वप्नील सिंगने पहिले षटक टाकले.

विराट कोहली बाद - राजस्थानने विराट कोहलीच्या (33) रूपाने आरसीबीला दुसरा धक्का दिला आहे. त्याने 8व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर युझवेंद्र चहलला टॉम कोहलर-कॅडमोरकरवी झेलबाद केलं. 7.2 षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या 56/2 झाली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 6 षटकांत 1 गडी गमावून 50 धावा केल्या. संघाला पहिला धक्का फाफ डू प्लेसिस 17 च्या रूपाने बसला. त्यानंतर विराट कोहली 33 धावा काढून बाद झाला. पहिला पॉवर प्ले राजस्थानच्या नावावर होता, ज्यामध्ये 1 मोठी विकेट देखील मिळाली.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फलंदाजीला सुरुवात केलीय. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाची सुरुवात केली आहे. राजस्थानसाठी ट्रेंट बोल्टने पहिलं षटक टाकलं आणि त्याने या षटकात एकूण 2 धावा दिल्या.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्लेइंग-11

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.

राजस्थान रॉयल्सचे प्लेइंग -11

यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

बंगळुरूचा संघ नवव्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला : आयपीएलचा हा १७वा सीझन आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ नवव्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. राजस्थान रॉयल्स आपला १५वा हंगाम खेळत सहाव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या बाबतीत विराट कोहलीच्या संघाचा संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सवर वरचष्मा पाहायला मिळतो. आयपीएलच्या पहिल्या सीझनचे विजेतेपद राजस्थान रॉयल्स संघाने पटकावले. मात्र त्यानंतर हा संघ कधीच फायनलमध्ये पोहोचला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. मात्र एकही विजेतेपद मिळवता आले नाही. बंगळुरू संघ अंतिम फेरीत अडकला तरी प्लेऑफची पहिली फेरी पार करण्याचा त्याचा विक्रम चांगला राहिला आहे.

बंगळुरूची सर्वोत्तम कामगिरी : आयपीएल २०२४ मधील फॉर्मबद्दल बोलायचे तर बंगळुरू आपली सर्वोत्तम कामगिरी करत आहे. सलग ६ सामने जिंकून हा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स संघाने अखेरचा विजय २७ एप्रिल रोजी मिळवला होता. यानंतर खेळलेल्या ५ पैकी ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यातील एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

बंगळुरूचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये: बंगळुरूसाठी चांगली गोष्ट म्हणजे या संघाचे सर्वच फलंदाज सध्या फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहली या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सलामीवीर फाफ डू प्लेसिसही ला चांगली साथ देत आहे. तर रजत पाटीदार मधल्या फळीत चांगली फलंदाजी करत आहे. कॅमेरून ग्रीन आणि दिनेश कार्तिकही फॉर्मात आहेत.

Last Updated : May 23, 2024, 7:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.