महाराष्ट्र

maharashtra

Uddhav Thackerays Resignation : मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले, वाचा महत्त्वाचे ५ मुद्दे

By

Published : Jun 30, 2022, 7:40 AM IST

Updated : Jun 30, 2022, 8:42 AM IST

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला ( Uddhav Thakcrey on Rebel leaders ) सुरुंग लावला. न्यायालयानेही शिवसेनेचे आव्हान फेटाळून लावल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे ( Uddhav Thakcreys Resignation ) सुपूर्द केला. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या सत्ता स्थापनेमध्ये कोणीही अडथळा आणू नये, असे आवाहन सर्व शिवसैनिकांना केले आहे.

Udhav Thakcreys Resignation
उद्धव ठाकरे

मुंबई-बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या ( rebel Eknath Shinde ) पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi government ) उद्या गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी पुढे ढकलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली असल्याने ठाकरे सरकारला मोठ्ठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला. शिवसेना नेते अनिल परब यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेवून त्यांना राजीनामा सुपूर्द दिला.

  1. सत्ता स्थापनेमध्ये अडथळा आणू नका-शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्याच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला ( Uddhav Thakcrey on Rebel leaders ) सुरुंग लावला. न्यायालयानेही शिवसेनेचे आव्हान फेटाळून लावल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे ( Uddhav Thakcreys Resignation ) सुपूर्द केला. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या सत्ता स्थापनेमध्ये कोणीही अडथळा आणू नये, असे आवाहन सर्व शिवसैनिकांना केले आहे.
  2. बळीराजाला कर्जमुक्त केले-आतापर्यंतची वाटचाल तुमच्या मदतीने केली. सरकार म्हणून अनेक कामे रायगड, बळीराजाला कर्जमुक्त केले. आपण विसरणार नाही. मला समाधान आहे. आयुष्य सार्थकी लागले. संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण केले. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची जागा दिली. एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. शरद पवार, सोनिया गांधी यांनी सहकार्य केले. त्या सर्वांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धन्यवाद दिले
  3. शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरू-औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले. शिवसेनेची चारच मंत्री उपस्थित होते. कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होते ते नामानिराळे. ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन केले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, अनेक शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केले. ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे देणे शक्य होते ते सगळे दिले. मातोश्रीला अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिले ते नाराज आहेत. ज्यांना काहीच मिळाले नाही ते सोबत आहेत. हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरू आहे, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
  4. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही-न्याय देवतेने निकाल दिला आहे. ज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले. पण १२ विधानपरिषद यादी आताही निर्णय घ्यावा.सुरतला गुवाहटीला जाऊन राहण्यापेक्षा मातोश्री समोर येऊन बोला. मला समोरासमोर हवयं. त्यांच्याशी वाद नकोय. मुंबईत बंदोबस्त वाढवला स्थानबध्द करत नोटीस आल्या. चीन सीमेची सुरक्षा कदाचित मुंबईत येईल. इतके नाते तोडले. कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नये. नवीन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्यामध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तर मला लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
  5. मी पुन्हा येईल असे बोललो नव्हतो-आम्ही हपालेले होऊन जात नाही. मुंबई आणि हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांना पेढे खाऊ द्या. मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. महाराष्ट्रात दंगल झाली नाही. मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो, पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचाही राजीनामा दिला. दरम्यान, मी पुन्हा येईल असे बोललो नव्हतो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. मात्र, आवर्जून सत्ता काळात मदत केलेल्या सर्व शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार मानत, त्यांनी मने जिंकली.

हेही वाचा-Uddhav Thackeray Resign CM Post : महाविकास आघाडी सरकार कोसळले; उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Last Updated : Jun 30, 2022, 8:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details