Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राज भवणावर;राज्यपालांकडे सादर केला राजीनामा

author img

By

Published : Jun 30, 2022, 12:14 AM IST

Updated : Jun 30, 2022, 1:23 AM IST

महाराष्ट्रातील राजकीय संकटात ( Maharashtra Political Crisis ) अखेर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रात्री उशीरा राजभवणावर पोचले ( Uddhav Thackeray reached Raj Bhavan ) ते स्वत: गाडी चालवत आले त्यांनी अवघ्या काही मिनीटांची राज्यपालांची भेट घेतली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर ( submitted his resignation to the Governor ) केला.

मुंबई: महाराष्ट्रातील राजकीय संकटात ( Maharashtra Political Crisis ) अखेर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे रात्री उशीरा राजभवणावर पोचले ( Uddhav Thackeray reached Raj Bhavan ) ते स्वत: गाडी चालवत आले त्यांनी अवघ्या काही मिनीटांची राज्यपालांची भेट घेतली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर ( submitted his resignation to the Governor ) केला.

उद्धव ठाकरे मातोश्री वरुन निघाल्याची माहिती मिळताच राज भवन परीसरात शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे समर्थक जमा झाले होते. ठाकरे यांनी राजीनाम्या पुर्वी सगळ्यांना जे सुरु आहे ते होऊद्या कोणालाही अडवु नका असे आवाहन केले होते. ते काही निवडक सहकारी आणि दोन्ही मुलांसह स्वत: गाडी चालवत राजभवनावर पोचलले. राज्यपालांशी त्यांनी काही मिनीटांची भेट घेतली आणि ते बाहेर पडले.

  • #WATCH Mumbai | Governor Bhagat Singh Koshyari accepts Uddhav Thackeray's resignation as Maharashtra CM. He had asked Uddhav to continue as CM until an alternate arrangement is made: Raj Bhavan pic.twitter.com/nWQ26bXkPN

    — ANI (@ANI) June 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी सभागृहात बहुमत सिद्ध करण्याच्या निर्देश दिले होते. याला शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयात आाव्हान दिले. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने फ्लोअर टेस्ट संदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. आणि उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी असा निर्णय दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे लाईव्ह आले. त्यांनी सोशल मीडिया वरून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.

  • #WATCH Mumbai | Uddhav Thackeray after submitting his resignation as Maharashtra CM to Governor visited a temple along with his son Aaditya Thackeray pic.twitter.com/GvpR0QIKSd

    — ANI (@ANI) June 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी ते म्हणाले की, मला समाधान आहे की, आम्ही औरंगाबादचे अधिकृतपणे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले आहे. जे बाळासाहेब ठाकरे यांनी नाव दिलेले शहर आहेत. आज मी तुमच्यासमोर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी मला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले.

जनते समोर येऊन त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केल्या नंतर राज्याच्या राजकारणात एकच गदारोळ झाला. भाजपच्या गोटात आनंद व्यक्त केला गेला राज्यभरात या घटनेबाबत उत्सुकता होती. त्या नंतर सगळ्यांच्या प्रतीक्रीया येत असताना रात्री उशीरा उद्धव ठाकरे हे राजभवणावर पोचले त्यांनी अवघ्या काही मिनीटांची राज्यपालांची भेट घेतली आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. आता राज्यात पुढे काय होणार या बद्दल तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान ते वापस येई पर्यंत ठाकरे कुटुंबियांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री परीसरात मोठी गर्दी झाली होती.तसेच वापस परतताना त्यांनी एका मंदिरात दर्शनही घेतले

हेही वाचा : Uddhav Thackeray Resign CM Post : महाविकास आघाडी सरकार कोसळले; उद्धव ठाकरेंनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Last Updated :Jun 30, 2022, 1:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.