ETV Bharat / city

NCP MLA Rohit Pawar : पवार कुटुंब फोडण्याचा भाजपचा डाव? रोहित पवारांच्या विधानावर विरोधी पक्षनेत्याने ही दिली प्रतिक्रिया

author img

By

Published : Oct 19, 2022, 1:16 PM IST

NCP MLA Rohit Pawar
अजित पवार

भारतीय जनता पक्षाला ( Bharatiya Janata Party ) पवार कुटुंबीय फोडयचे आहे. पवार कुटुंबीयांमध्ये अंतर्गत भांडण लावायचे आहेत असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar ) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केल आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाला ( Bharatiya Janata Party ) पवार कुटुंबीय फोडायचा आहे. पवार कुटुंबीयांमध्ये अंतर्गत भांडण लावायचे आहेत असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार ( NCP MLA Rohit Pawar )यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केल आहे. मात्र रोहित पवार यांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय ? रोहित पवार यांना काय म्हणायचे होते? हे आपण त्यांना नक्की विचारू असंच स्पष्टीकरण राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार ( NCP leader Ajit Pawar ) यांनी मुंबईत प्रदेशकर्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिल आहे.

शिंदे यांचे नवीन सरकार किती दिवस टिकणार ? सध्या केलेल्या वक्तव्यांचा विपर्यास केला जातोय. शिंदे यांचे नवीन सरकार किती दिवस टिकणार असं आपल्याला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेला प्रश्नाला उत्तर देताना आपण जोपर्यंत राज्य सरकारकडे 145 आमदारांचा पाठबळ आहे. तोपर्यंत हे सरकार टिकेल असं आपण सांगितलं होतं. मात्र आपल त्या वक्तव्याचा देखील विपर्यास केला गेला असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.


काय म्हणाले होते रोहित पवार : रोहित पवार आणि अजित पवार यांचे नातेसंबंध चांगले नाहीत अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत असल्याबाबत प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, काका अजित पवार यांनीच आपल्याला आमदारकीसाठी तिकीट दिलं यासोबतच जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहण्यासाठी देखील त्यांनीच प्रोत्साहन दिलं होतं. एवढेच काय तर आपलं लग्नही त्यांनीच ठरवलं. पवार कुटुंब कधीही कौटुंबिक भांडणात वेळ घालवत नाही. खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेत लक्ष देतात, अजित पवार हे राज्यात लक्ष देतात आणि माझ्यावरची जबाबदारी सोपवली त्याप्रमाणे मी लक्ष देत आहे. अंतर्गत भांडणामुळे शिवसेनेत ज्याप्रमाणे फूट पाडली. तशी पवार कुटुंबीयातही फूट पडेल असं भारतीय जनता पक्षाला वाटते. त्यामुळे शिवसेनेनंतर पवार कुटुंबीय टारगेट असू शकते असं वक्तव्य मुलाखतीदरम्यान रोहित पवार यांनी केलं होतं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.