महाराष्ट्र

maharashtra

Mumbai NCB Seizes Drugs : मुंबई विमानतळावर एनसीबीची कारवाई, ऑस्ट्रेलियाला जात असलेले ड्रग्ज जप्त

By

Published : Dec 11, 2021, 12:28 PM IST

Updated : Dec 11, 2021, 2:44 PM IST

मुंबईहून ऑस्ट्रेलियाला (Mumbai To Australia) पाठवण्यात येत असलेले ड्रग्ज एनसीबीच्या (NCB Seizes Drugs) पथकाने जप्त केले आहेत. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) ही कारवाई करण्यात आली. यासह मुंबईत आणखीही काही ठिकाणी एनसीबीमार्फत छापे (NCB Raids) टाकण्यात येत आहेत.

मुंबई विमानतळावर एनसीबीची कारवाई
मुंबई विमानतळावर एनसीबीची कारवाई

मुंबई :अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) मुंबईत मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर छापा टाकत पथकाने एमडी ड्रग्ज (MD Drugs) जप्त केले आहेत. मुंबई एनसीबीने मुंबईत काही ठिकाणी छापे टाकले असून, छापेमारीचे हे सत्र सुरूच आहे.

मुंबई एनसीबीने मुंबई विमानतळावर एमडी ड्रग्ज जप्त (Mumbai NCB seizes MD drugs at Mumbai airport) केले आहेत. हे ड्रग्ज मुंबईहून ऑस्ट्रेलियाला (Mumbai To Australia) कुरिअरने पाठवले जात होते. विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांच्या कारवाईत एनसीबीने डोंगरी भागातील एका 30 वर्षीय तरुणाला ताब्यात (NCB Arrested Youth In Dongari) घेतले आहे. त्याला मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात (NCB Office Mumbai) घेऊन जाण्यात आले आहे.

त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता कुरिअरच्या पाकिटावर होता ज्याद्वारे कुरिअर परदेशात पाठवण्यात येत होते. मुंबई विमानतळावरील कारवाईनंतर एनसीबीची छापेमारी सुरूच आहे.

Last Updated :Dec 11, 2021, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details