महाराष्ट्र

maharashtra

Cm Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगींची मोठी घोषणा; उत्तरप्रदेशात 60 वर्षांवरील महिलांना मोफत बस प्रवास

By

Published : Aug 10, 2022, 4:31 PM IST

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Cm Yogi Aditynath ) यांनी बुधवारी लखनौमध्ये 150 नवीन बीएस-6 डिझेल बसचे उद्घाटन केले. त्याचसोबत लवकरच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला उत्तरप्रदेशमध्ये बसमधून मोफत प्रवास करतील, असे त्यांनी म्हटलं ( cm yogi in lucknow ) आहे.

Cm Yogi Adityanath
Cm Yogi Adityanath

लखनौ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Cm Yogi Aditynath ) यांनी बुधवारी लखनऊमध्ये 150 नवीन बीएस-6 डिझेल बसचे उद्घाटन केले. त्याचसोबत मुख्यमंत्री योगींनी परिवहन विभागाच्या टेस्टिंग ट्रॅक आणि ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर अलिगढ, बरेली, झाशी आणि सारथी हॉल फिरोजाबादचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. रक्षाबंधनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला नवीन बसेसची सर्वोत्तम भेट दिली आहे. विमानतळांच्या धर्तीवर बसस्थानकांचा विकास करायला ( world class bus station shoud be developed like airport ) हवा, असे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटलं ( cm yogi in lucknow ) आहे.

'महिलांना 12 ऑगस्टपर्यंत बस मोफत' - मुख्यमंत्री योगी म्हणाले की, लवकरच 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिला उत्तरप्रदेशमध्ये बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. बुधवारी रात्री 12 वाजल्यानंतर 12 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील सर्व महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. तसेच, राज्यातील सर्व 75 जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी दोन नवीन बसेस मिळणार आहेत, असेही त्यांनी सांगितलं.

'उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला मोठा इतिहास' -सामन्या माणून जेव्हा घराबाहेर पडतो, तेव्हा त्याला कुठेतरी जावे लागते. तेव्हा सर्वप्रथम त्याला रस्ते परिवहन महामंडळाच्या बसला समोरे जावे लागते. उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाला मोठा इतिहास आहे. पण, काळानुसार महामंडळाकडे लक्ष देण्याची, आपली यंत्रणा चांगल्या आणि व्यावसायिक पद्धतीने सुरुळीत ठेण्याची आवश्यकता होती. ती वेळेनुसार होऊ शकली नाही. मात्र, 2019 साली प्रयागराजमध्ये कुंभमेळा होता. भाविकांच्या सोयीसाठी, राज्य सरकारने प्रयागराज मेळा प्राधिकरणामार्फत आणि परिवहन महामंडळाच्या माध्यमातून त्या सर्व बसेसचा ताफा परिवहन महामंडळाला उपलब्ध करून दिला, असेही मुख्यमंत्री योगींनी स्पष्ट केलं.

'कुंभमध्ये २४ कोटी भाविकांनी बसेसचा लाभ' - आम्हाला 2019 मध्ये मिळालेल्या बसेसने त्यांची सेवा उत्तम प्रकारे दिली. कोरोनाच्या काळात परप्रांतीय आपापल्या घराकडे चालले असताना या बसेस कामी आल्या. या बसेसमधून एक कोटीहून अधिक स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले. एकूण 40 लाख कामगार उत्तर प्रदेशातील होते. 30 लाख बिहारचे होते. उर्वरित झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, आसाम या राज्यांतील होते. मानवतेचे ऐवढे उत्तम उदाहरण कुंभ मेळाव्यानंतर प्रथमच पाहायला मिळालं. कुंभमध्ये २४ कोटी भाविकांनी बसेसचा लाभ घेतला होता, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा -Nitish Kumar : '2014 मध्ये जिंकलात, 2024 ची काळजी...'; शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांचा पंतप्रधानांवर निशाणा

ABOUT THE AUTHOR

...view details