ETV Bharat / state

आरटीई घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता, दोन पालकांना अटक मात्र, मुख्य आरोपी फरारच - RTE scam

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:59 PM IST

RTE Scam Update : नागपुरात झालेल्या आरटीई घोटाळ्याचा मुख्य आरोपी शाहिद शरीफ हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नागपूर पोलिसांची अनेक पथकं त्याचा शोध घेत आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी 19 पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत तर 2 पालकांना अटक करण्यात आलीय.

आरटीई घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता, दोन पालकांना अटक मात्र, मुख्य आरोपी फरारच
आरटीई घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता, दोन पालकांना अटक मात्र, मुख्य आरोपी फरारच (ETV Bharat Reporter)

शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल (ETV Bharat Reporter)

नागपूर RTE Scam Update : नागपुरात झालेल्या आरटीई घोटाळ्याचा मुख्य आरोपी शाहिद शरीफ हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नागपूर पोलिसांची अनेक पथकं त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी शाहिद शरीफच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्र आणि एक तलवार मिळालेली आहे. याप्रकरणात नागपूर पोलिसांनी 19 पालकांवर गुन्हे दाखल केले आहेत तर 2 पालकांना अटक करण्यात आलीय. मुख्य आरोपी हा काही काळापूर्वी शासनाच्या एका समितीचा सदस्य देखील होता. त्यानं शासनाची फसवणूक केली आहे. बनावट कागदपत्रं तयार केलीय, याची चौकशी सुरु असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली आहे.

पालक आणि दलाल पोलिसांच्या रडारवर : आरटीई (राईट टू एज्युकेशन) म्हणजेच शिक्षण हक्क कायद्यांतर्गत नागपुरातील विविध शाळेत बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवणारे पालक व दलाल नागपूर पोलिसांच्या रडारवर आले आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश शाळेत मिळवणाऱ्या 19 पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता : या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून 3 किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्राधान्य क्रमानुसार 'आरटीई' अंतर्गत प्रवेश दिला जातो. या शाळा उपलब्ध नसल्यास खासगी शाळेत प्रवेश घेता येतो. मात्र,काही पालकांनी दलालांच्या मदतीनं बोगस कागदपत्रांच्या आधारे नामांकित शाळेत प्रवेश मिळवला. शिक्षण विभागानं संशयाच्या आधारे तपास केला तेव्हा 17 पालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवल्याचं उघड झालं. त्यानंतर शिक्षण विभागानं सर्व संबंधित मुलाचा प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली असून 19 पालकांविरोधात कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

दोन पालकांना अटक, तर एजंटचा शोध सुरु : राईट टू एज्युकेशन घोटाळ्यात दोन पालकांना पोलिसांनी अटक केलीय, तर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सीताबर्डी व सदर पोलीस स्टेशनचे दोन विशेष पथक गठीत करण्यात आलं. हे पोलीस पथक कागपत्र तसंच ज्या पालकांनी खोटे पत्ते दिले, त्यांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत दोन आरोपी पालकांना अटक करण्यात आली आहे. ज्या दलालाचा माध्यमातून सगळे कागदपत्र तयार केले त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसंच राईट टू एज्युकेशनचा घोटाळा एकाच एजंटच्या माध्यमातून झाल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं असून या एजंटच्या अंतर्गत अनेक छोटे एजंट काम करत आहेत, त्यांचा शोध पोलिसांनी सुरु केलाय.

तीन शाळेत झाले प्रवेश : आतापर्यंत तीन शाळांमध्ये हा प्रकार झाल्याच समोर आलेल आहे. आत्तापर्यंत 19 आरोपी हे निष्पन्न झालं असून ही संख्या आणखी वाढले अशी शक्यता असून, त्यावेळी संपूर्ण चौकशी एसआयटीकडे सोपवली जाऊ शकते.

काय आहे प्रकरण : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून 3 किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, सरकारी शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्राधान्य क्रमानुसार 'आरटीई' अंतर्गत प्रवेश दिला जातो. या शाळा उपलब्ध नसल्यास खासगी शाळेत प्रवेश घेता येतो. मात्र, काही पालकांनी दलालांच्या मदतीनं बोगस कागदपत्रांच्या आधारे नामांकित शाळेत प्रवेश मिळवला. शिक्षण विभागानं संशयाच्या आधारे तपास केला तेव्हा 19 पालकांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश मिळवल्याचं उघड झालं. त्यानंतर शिक्षण विभागानं सर्व संबंधित मुलाचा प्रवेश रद्द करण्याची प्रक्रिया सुरु केली असून 19 पालकांविरोधात सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये कलम 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.