ETV Bharat / bharat

स्वाती मालीवाल प्रकरणात अरविंद केजरीवाल आणखी अडचणीत येणार? दिल्ली पोलिसांकडून आई-वडिलांची चौकशी होणार - Swati Maliwal row

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 10:49 AM IST

Police Interrogate Kejriwal Parents : स्वाती मालीवाल प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पालकांची आज (23 मे) दिल्ली पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. तसंच चौकशीसाठी पोलिसांना 11:30 ची वेळ देण्यात आल्याचंही सांगितलं जातंय.

Delhi Police to interrogate CM Kejriwal parents on Swati Maliwal assault case
स्वाती मालीवाल प्रकरण (Etv Bharat)

नवी दिल्ली Police Interrogate Kejriwal Parents : आम आदमी पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांच्यावरील कथित प्राणघातक हल्ला प्रकरणी दिल्ली पोलीस आज (23 मे) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पालकांची चौकशी करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या पालकांच्या वतीनं दिल्ली पोलिसांना गुरुवारी सकाळी 11.30 वाजता येण्यास सांगण्यात आलंय.

मुख्यमंत्र्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टही केलंय. त्यात त्यांनी म्हटले, " माझ्या वृद्ध आणि आजारी आई-वडिलांची चौकशी करण्यासाठी गुरुवारी दिल्ली पोलीस येणार आहेत." स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तसंच ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री केजरीवाल यांचे आई-वडील घरीच उपस्थित होते, असं चौकशी मागील कारण सांगितलं जातंय. मात्र, असं असतानाच आम आदमी पक्षानं यावर आक्षेप घेत भाजपावर निशाणा साधलाय.

या प्रकरणी 'आप'चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की , "देशातील जनतेनं राजकारणात एवढा द्वेष यापूर्वी कधीच पाहिला नसेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीच्या जनतेसाठी रात्रंदिवस काम करत आहेत. त्यांना शिक्षा झाली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांच्या शिक्षणमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यांच्या आरोग्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. मलाही तुरुंगात टाकण्यात आलं. राजकीय द्वेषातून पंतप्रधान इतके पुढं गेलेत की, त्यांना अरविंद केजरीवाल यांच्या वृद्ध आणि आजारी आई-वडिलांचा पोलिसांकडून छळ करायचा आहे. दिल्ली आणि देशातील जनता अरविंद केजरीवाल यांच्या वृद्ध आई-वडिलांच्या अपमानाचा बदला नक्कीच घेईल. "

दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "केंद्र सरकारनं सर्व प्रतिष्ठा आणि सार्वजनिक आदर नष्ट केलाय. मुख्यमंत्र्यांना अटक होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांच्या आई रुग्णालयातून परतल्या होत्या. आता दिल्ली पोलीस त्यांच्या वृद्ध आई-वडिलांची चौकशी करतील. हे अतिशय क्रूर आणि वाईट राजकारण आहे."

हेही वाचा -

  1. स्वाती मालीवाल यांचे सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोप; दिल्ली पोलिसांनी बिभव कुमारला केलं अटक - Swati Maliwal Assault Case
  2. स्वाती मालीवाल प्रकरण 'एसआयटी'कडे; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - SWATI MALIWAL ASSAULT CASE
  3. आम्हाला अटक कराल, आमच्या विचारांना कशी करणार अटक ? अरविंद केजरीवालांचा पोलिसांना सवाल - KEJRIWAL PROTEST BJP HEADQUARTER
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.