ETV Bharat / bharat

Nitish Kumar : '2014 मध्ये जिंकलात, 2024 ची काळजी...'; शपथ घेतल्यानंतर नितीश कुमारांचा पंतप्रधानांवर निशाणा

author img

By

Published : Aug 10, 2022, 3:38 PM IST

Nitish Kumar pn narendra modi
Nitish Kumar pn narendra modi

जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला ( Cm Nitish Kumar Attacks Pm Narendra Modi ) आहे.

पाटणा - जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल फागू चौहाना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली आहे. त्यांच्यासोबत आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तेजस्वी यादव यांनी दुसऱ्यांना बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला ( Cm Nitish Kumar Attacks Pm Narendra Modi ) आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शपथ घेतल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांवर निशाणा साधत विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केलं आहे. नितीश कुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदी 2014 मध्ये जिंकले. पण, आता त्यांनी 2024 ची काळजी करायला हवी. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधकांनी एकत्र यावे, अशी माझी इच्छा आहे. मी 2024 साली पंतप्रधानपदाचा दावेदार नाही. नवीन सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, असा टोला नितीश कुमारांनी विरोधकांना लगावला आहे.

  • Those who came to power in 2014, will they be victorious in 2024? I would like all (opposition) to be united for 2024. I am not a contender for any such post (on PM post): Bihar CM Nitish Kumar pic.twitter.com/XI7BPaAA9K

    — ANI (@ANI) August 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मागील 22 वर्षांत नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आहेत. 2000 मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. तेव्हा अवघे सात दिवस ते मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले. दरम्यान, भाजपने जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात, असल्याचा आरोप करत नितीश कुमारांनी भाजपसोबतची युती तोडली. मंगळवारी आमदार आणि खासदार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. बैठक झाल्यावर नितीश कुमार यांनी आपला राजीनामा दिला. आज अखेर नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा - Nitish Kumar Took Oath As Chief Minister : नितीश कुमार यांनी घेतली आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.