ETV Bharat / bharat

जेवणाच्या वादातून सहकाऱ्यावर कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला; हल्लेखोर सहकाऱ्याला अटक - Thane crime

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 10:15 AM IST

Thane crime- जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून डेकोरेशन करणाऱ्या दोन सहकाऱ्यांचं वाद झालं. या वादाचे रुपांतर रक्तरंजित राड्यात होऊन कुऱ्हाडीनं हल्ला झाल्याची घटना घडली. यात आरोपी सलीन खानला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

argued over food and fatally attacked
जेवणावरून दोघांमध्ये वाद (ETV REPOETER)

ठाणे Thane crime: डेकोरेशनचं काम करणाऱ्या दोन मित्रांमध्ये जेवणाच्या क्षुल्लक कारणावरून खटके उडून वादाचे रुपांतर रक्तरंजित राड्यात झाले. आरोपीनं सहकाऱ्यावर कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कोनगाव बकरी मंडई भागात असलेल्या एका मंडपच्या गोदामात घडली.

हल्लेखोर सहकाऱ्यावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सलीन अन्वर खान(वय ३७) हे अटक केलेल्या हल्लेखोराचं नाव आहे. तर भरत शामबाबू राजलोहार (वय, २२) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहकाऱ्याचं नाव आहे.

काय आहे प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गोविंदकुमार मुन्ना वर्मा(वय २२० याचा भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील बकरी मंडई भागात डेकोरेशनचा व्यवसाय आहे. यात जखमी भरत आणि आरोपी सलीम हे दोघेही त्यांच्यासोबत काम करतात. दोघे १९ मे रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कोनगाव परिसरातील म्हात्रेगाव मैदानातील इंग्रजी माध्यमिक विद्यालयाजवळील अनिल कुमार यांच्या गोदामात मंडप डेकोरेशनचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी भरत आणि सलीन यांच्यामध्ये जेवणावरून वाद होऊन वादाचे रुपांतर राड्यात झाले. यावेळी सलीमनं रागाच्या भरात भरतवर कुऱ्हाडीने वार केले. यात भरत गंभीर जखमी झाला.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल : या घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत जखमीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी गोविंदकुमार वर्मा याच्या फिर्यादीवरून सलीमवर ३०७ सह कोनगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून २० मे रोजी अटक करण्यात आली. २१ मे रोजी न्यायालयात हजर केलं असता त्याला २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनवाल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक गायकवाड यांनी दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.हेही वाचा

  1. रागाच्या भरात लोकलमध्ये प्रवाशाला चाकूनं भोसकलं; दोन जणांना अटक, दोन फरार - Knife attack on passengers
  2. बंगळुरुमध्ये नायजेरियन नागरिकांचा पोलिसांवर हल्ला; 8 परदेशी नागरिकांना अटक - 8 Foreign Nationals Arrested
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.