ETV Bharat / state

रागाच्या भरात लोकलमध्ये प्रवाशाला चाकूनं भोसकलं; दोन जणांना अटक, दोन फरार - Knife attack on passengers

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 11:00 PM IST

Knife attack on passengers
Knife attack on passengers (Maharashtra Desk)

Knife attack on passengers : टिटवाळा वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधील प्रवाशांवर चाकूनं हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी रुग्णालयात प्रवाशाचा मृत्यू झाला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

ठाणे Knife attack on passengers : चेष्टा मस्करी केल्याच्या रागातून चार जणांच्या टवाळखोर टोळीनं एका प्रवाशाला धावत्या लोकलमध्ये चाकूनं भोसकल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील टिटवाळा ते वाशिंद रेल्वे स्थनाका दरम्यान धावत्या लोकलमध्ये घडली. खळबळजनक बाब म्हणजे चार दिवसांच्या उपचारानंतर गुरुवारी प्रवाशाचा मृत्यू झालाय. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हल्लेखोरांवर विविध कलमानुसार गुन्हा दखल केलाय. तसंच या प्रकरणी दोघाना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. अमोल महावीर परदेशी (वय 40, रा. शहापूर) तसंच तनुज रवींद्रकुमार जम्मूवाल (वय 21, रा. वाशिंद ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. तर, दत्ता धुंदा भोईर (वय 55, ) असे चाकू हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रदीप जगन शिरोसे (वय 40), मृतक दत्तात्रय भोईर यांच्यासह 28 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास उल्हासनगर येथे आपल्या मित्राच्या हळदी समारंंभासाठी आले होते. सभारंभ संपल्यानंतर 28 एप्रिल रोजी घरी जाण्यासाठी त्यांनी उल्हासनगर रेल्वे स्थानकात पाहटे दोन वाजताच्या सुमारास येणारी कसारा लोकल पकडली. मृतक दत्तात्रय, प्रदीप शिरोसेसह इतर प्रवासी एका बाकड्यावर बसून एकमेकांची चेष्टा मस्करी करत होते. यावेळी या प्रवाशांच्या समोर मद्य सेवन करून चाकू असलेल्या तरुणांचं टोळकं बसले होतं. त्यावेळी मृत दत्तात्रय भोईर हे आपल्याकडं बघून हसतात, तसंच आपलीच चेष्टा करतात असा गैरसमज आरोपी अमोल परदेशी यानं केला. त्यामुळं आरोपीची भोईर यांच्यासोबत बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी दत्तात्रय भोईर यांना बेदम मारहाण करून चाकूनं भोसकलं. खडवली रेल्वे स्थानक गाडी येताच डब्यातील सर्व प्रवाशांनी दोन आरोपींना पकडून रेल्वे सुरक्षा जवानांच्या ताब्यात दिलं. इतर दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले.


घटनेची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी जखमी भोईर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर प्रदीप जगन शिरोसे याच्या तक्रारीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्याशी संपर्क साधला असता, दोन्ही आरोपीना घटनेच्या दिवशीच अटक केल्याचं सांगितलं. त्यांना 29 एप्रिल रोजी रेल्वे न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर घटनेतील चार आरोपीवर हत्येचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहे. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरिक खोंडे करीत असल्याचंही त्यांनी सागितलं.

हे वाचलंत का :

  1. 'किल'चा टीझर लवकरच होणार प्रदर्शित; करण जोहरनं शेअर केली पोस्ट - kill teaser out soon
  2. Cyber Menace डिजिटल फसवणूक; एक चिंताजनक सायबर धोका
  3. 'पोचर'चा अधिकृत ट्रेलर रिलीज, सर्वात मोठ्या गुन्हेगारी रॅकेटचा 23 तारखेला होणार पर्दापाश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.